pune corona
pune corona 
पुणे

पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र रात्रीच्या संचारबंदीत वाढ 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शनिवारी (ता.३) रात्रीपासून पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स आणि चित्रपटगृहे पुढील सात दिवसांसाठी म्हणजे शुक्रवारपर्यंत बंद राहतील. परंतु हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहील. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी हे आदेश लागू राहतील. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. 

हेही वाचा - पुण्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे रुग्णाचा रस्त्यात मृत्यू
राव म्हणाले, जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे २८ टक्क्यांवरून ३२ टक्के झाले असून, चिंतेची बाब आहे. दररोज नवीन रुग्ण सहा हजारांवरून आठ हजारांवर आली आहे. हेच प्रमाण वाढत राहिल्यास नऊ हजारांवर रुग्ण होतील. कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असून, गुरुवारी एका दिवशी २९ हजार चाचण्या झाल्या आहेत. गतवर्षी १३ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयातील बेड॒स ताब्यात घेण्यात आले होते. तेवढे बेड॒स सहा एप्रिलपर्यंत उपलब्ध होतील. पुणे विभागातही कोल्हापूर वगळता सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही कोरोना संगर्गाचे प्रमाण वाढले आहे. 
सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, खासगी कार्यालयांमधून संचारबंदीच्या काळात घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबत पत्र दिले, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. 

देशात सर्वाधिक लसीकरण पुणे जिल्ह्यात करण्यात येत आहे. काल गुरुवारी ५७ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. येत्या तीन-चार दिवसांपासून दररोज ८० हजार जणांना लसीकरण करण्यात येणार असून, हे प्रमाण एक लाखापर्यंत नेण्यात येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर कोरोना बाधित झाल्यास सौम्य लक्षणे असतील. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्यात येत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात १८ वर्षे वयावरील एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाख आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४५ वर्षे वयावरील २६ लाख नागरिकांना लस देण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणानुसार उर्वरित त्यापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या सर्वांना 'मिशन १०० डेज'मध्ये लसीकरण करण्यात येणार आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT