Pune Niranjan Oval Youth Businessman 
पुणे

Pune : भारतीय युवा शक्ती ट्रस्ट पुरस्कृत उद्योजकाचा जागतिक पुरस्काराने गोरव

निरंजन ओव्हाळ यांना "युथ बिझिनेस इंटरनॅशनल ग्लोबल' संस्थेच्या वतीने "युवा उद्योजक २०२२' पुरस्कार

कृष्णकांत कोबल

हडपसर : भारतीय युवा शक्ती ट्रस्ट पुरस्कृत मांजरी बुद्रुक येथील तरूण उद्योजक निरंजन ओव्हाळ यांना उद्योजक कोविड रेजिलिअन्स प्रवर्गात "युथ बिझिनेस इंटरनॅशनल ग्लोबल' संस्थेच्या वतीने "युवा उद्योजक २०२२' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नेदरलँड येथे झालेल्या या कार्यक्रमात ओव्हाळ यांच्या वतीने भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त लक्ष्मी वेंकटरमण वेंकेटेशन यांनी युथ बिसनेस इंटरनॅशनलचे चेअरमन मार्था कृपिन्स्का यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व उद्योगासाठी विशेष मार्गदर्शन असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

निरंजन ओव्हाळ यांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून पुणे येथे सिम्फोर्ज इंजिनिअरिंग हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी कोविड कालावधीत अडचणींचा सामना करीत आपला उद्योग यशाच्या शिखरावर नेला.

लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना व्हिडिओ गेम खेळण्याची सवय लागली. परंतु त्यापैकी अनेक लोकांना दर्जेदार महागड्या रेसिंग गेम खेळणे परवडणारे नव्हते. निरंजनने लोकांच्या ह्याच समस्येवर मात करण्याचे ठरवले. त्याला ह्या क्षेत्रातील संधी खुणवू लागली. अथक परिश्रम, संशोधन करून त्याने ऑटो रेसिंग उत्पादकांना अधिक थरारक होईल असे रेसिंग गिअर कमी किमतीत उपलब्ध करून दिले.

ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना दर्जेदार रेसिंग गेम खेळणे शक्य झाले. उद्योजक ओव्हाळ यांची सिम्फोर्ज इंजिनीअरिंग ही भारतातील पहिली आणि एकमेव रेसींग गियर बनवणारी उत्पादक कंपनी आहे. विद्यार्थी वर्ग, अल्प उत्पन्न असणारा युवक, शैक्षणिक संस्था याना विशेष सवलतीत सिम फोर्ज आपली उत्पादने उपलब्ध करून देत आहे.

उद्योजक ओव्हाळ म्हणाले, "कोविड कालावधीत अनेक उद्योग डबघाईला आलेले असताना माझ्या कंपनीने मात्र एका वर्षातच आपली विक्री तब्बल अकराशे पटीने वाढवली. सध्या कंपनीकडे अधिकृत असे तीन डिस्ट्रिब्युटर आणि शिपिंग कॉन्ट्रॅक्ट आहे. येत्या काळात सिम रेसिंगची पूर्ण इकोसिस्टिम उत्पादित करून नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, यूरोप आणि आशिया आदी सर्व ठिकाणी आपला सेटअप उभा करायचे नियोजन आहे.

भारतातल्या प्रत्येक घरात रेसिंग सेटअप उभा करायचा आणि भारतासारख्या विकसन शील देशातून अधिक अधिक मोटार स्पोर्ट ड्रायव्हर्स निर्माण करायचे स्वप्न आहे. या पुरस्काराने मला मोठी प्रेरणा मिळाली असून भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे त्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे.'

काय आहे भारतीय युवा शक्ती ट्रस्ट :

भारतीय युवा शक्ती ट्रस्ट 'ना -नफा' तत्वावर काम करणारी सामाजिक संस्था आहे. ही संस्था वंचित भारतीय युवकांच्या कल्पनांचे रूपांतर मेंटॉरच्या मार्गदर्शनाद्वारे व्यवहार्य उद्योगामध्ये करते. प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या प्रेरणेतून सन १९९२ साली संस्थेची स्थापना झाली आहे. जे .आर .डी टाटा, राहुल बजाज यासारखे उद्योजक या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. संस्था कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री संस्थेची धोरणात्मक भागीदार आहे. युवा उद्योजकांना संस्थेच्या भागीदार असणाऱ्या राष्ट्रीय कृत बँकांच्या द्वारे विनातारण, विनाजामीन अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

आतापर्यंत संस्थेने सुमारे पाचशे कोटी रूपयांचे अर्थसहाय्य तरूणांना उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय उद्योजकांना समुपदेशन, उद्योजकता विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन, नेटवर्किंग, मेळावे व पुरस्कार यासारख्या सेवा संस्थेकडून मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. मागील तीस वर्षात संस्थेने सुमारे बारा हजार उद्योजक उभे केले असून त्याद्वारे साडेतीन लाख रोजगार निर्माण केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : विदर्भात उष्णतेचा कहर कायम; पुढील चोवीस तासांसाठी धोक्याचा इशारा

Sharad Pawar Congress Merger : शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? काँग्रेस नेत्यांकडून सूचक वक्तव्य; राहुल गांधी, खर्गे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT