Chandrakant Patil
Chandrakant Patil sakal
पुणे

Pune News : एनएसएस अधिक लोकाभिमुख करणार; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय सेवा योजनेसाठी जवळपास पाच लाखांवर युवक-युवतींनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. या सर्वांपर्यंत हे उपक्रम पोहोचविल्यास, विकसित भारत देशाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होणार आहे. या पुढील काळात एनएसएसचे उपक्रम अधिकाधिक व्यापक करणे, तसेच स्वयंसेवकांना अधिकाधिक प्रबळ व समाजाभिमुख बनविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन आणि जी-२० परिषदेनिमित्ताने पुण्यात नजिकच्या काळात आयोजित शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या उपक्रम अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजयकुमार, सहसचिव अर्चना अवस्थी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'जी-२० परिषदेच्या शैक्षणिक उपक्रमांच्या संदर्भाने येत्या वर्षभरात पुण्यात विविध शैक्षणिक उपक्रम, तसेच जगभरातील शिक्षणमंत्र्यांच्या पुणे भेटीचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये अपेक्षित शैक्षणिक उपक्रमांविषयीची जनजागृती या अधिवेशनामध्ये अपेक्षित आहे. उपस्थित सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ही जनजागृती राज्यभरातील सर्व स्वयंसेवकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.'

केसरकर म्हणाले, 'देशातील युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठेविषयी जाणीव निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होणे शक्य आहे. जगाला एकीकडे कार्यकुशल मनुष्यबळाची असणारी गरज, तर दुसरीकडे तरुणांचा देश म्हणून असणारी भारताची एक वेगळी ओळख आपण सध्या अनुभवत आहोत. देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळाल्यास, देशातील युवक हे केवळ देशासाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही कुशल मनुष्यबळ म्हणून उपयुक्त ठरू शकतील.'

पांडे म्हणाले, 'पुण्यात होणाऱ्या जी-२० एज्युकेशन समिटमध्ये अपेक्षित विविध उद्दिष्टांविषयी राज्यभरातील युवकांना माहिती मिळावी, असे काम या अधिवेशनातून होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये समाजसेवा, देशसेवा आणि एकात्मतेविषयीची जाणीवजागृती निर्माण केली जाते. त्यामुळे या अधिवेशनामागे कोणताही राजकीय अजेंडा नाही, तर हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे.' प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT