obc reservation sakal
पुणे

इम्पिरिकल डेटापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा डेटा जाहीर करा

पुण्यातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर दोन ऑक्‍टोबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : धनगर विवेक जागृती अभियान संघटनेने राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी अपात्र व्यक्तींची नेमणूक केल्याचा आरोप करीत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार होण्यापूर्वी आयोगाच्या संबंधित सदस्यांचा डेटा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी पुण्यातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर दोन ऑक्‍टोबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय झाल्यावरच निवडणुका घ्याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचा इम्पिरिकल डेटा सादर करणे गरजेचे आहे. तो मान्य झाला तरच आरक्षण मिळणार आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.

राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवले आहे. परंतु आयोगावरील सदस्य अपात्र असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आयोगाच्या सदस्यांना सचिव पदाचा दर्जा असूनही कोणत्याही सदस्यांच्या कागदपत्रांची तपासणी आणि चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली नाही.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या कायद्यानुसार सदस्य हे निकषांस पात्र असणे आवश्यक आहे. शिवाय ते तज्ज्ञ म्हणून तटस्थ असण्याची गरज आहे. परंतु तशी परिस्थिती आयोगाच्या सदस्यांच्या बाबतीत दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर अपात्र सदस्यांना वगळून संबंधित प्रवर्गातील पात्र सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पुण्यात गुलाबो गँग महिलांचे भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात आंदोलन

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT