शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ वाटप  sakal
पुणे

पुणे : ऑक्टोबरअखेर सर्व शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ वाटप

अन्नधान्य वितरण कार्यालयाची माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश रेशन दुकानांमध्ये ऑक्टोबर महिन्यातील गहू, तांदूळ आणि अंत्योदय योजनेतील साखर पोच झाली आहे. आजअखेर ८५ टक्के धान्य वाटप झाले असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत जवळपास ९५ टक्के धान्य वाटप होईल, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. दरम्यान, दिवाळीत साखर आणि चणा डाळ उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

ऑक्टोबर महिन्यातील तांदूळ बहुतांश रेशन दुकानांमध्ये पोचला नव्हता. तसेच, तांदळाचा दर्जाही खराब असल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारकांकडून प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी ढोले म्हणाले, धान्य उचल करण्यास भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामामधून (एफसीआय) सुरवात झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत पुढील महिन्यातील धान्यही दुकानात उपलब्ध होईल. धान्याचा दर्जा सुधारण्याबाबत खाद्य महामंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दर महिन्यास ५ हजार दोनशे मेट्रिक टन तांदूळ आणि १२ हजार ९९० मेट्रिक टन इतका गहू वितरित करण्यात येतो.

साखर, चणा डाळ, तेल उपलब्ध करून द्या :

अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदळासोबत साखर उपलब्ध करून देण्यात येते. परंतु या लाभार्थ्यांची संख्या केवळ ३२ हजारांच्या आसपास आहे. दिवाळीत सणासुदीच्या कालावधीत राज्य सरकारने अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्यक्रम कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना साखर, तेल आणि चणा डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दर्जेदार धान्य पुरवावे, अशा सूचना भारतीय खाद्य महामंडळाला अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडून पावती घ्यावी.

- सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील स्थिती :

  • एकूण रेशन दुकानांची संख्या ७२४

  • एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या १० लाख २६ हजार

  • धान्य मिळणाऱ्या प्राधान्यक्रम कुटुंबातील शिधापत्रिकाधारक ३ लाख २२ हजार

  • लाभार्थ्यांची संख्या १२ लाख ८९ हजार ७४

अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक ८ हजार १७७

लाभार्थ्यांची संख्या ३५ हजार २७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT