Prisoner 
पुणे

इकडं जामीन मंजूर झाला, अन् तिकडं त्याला कोरोना झाला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी तयार केलेल्या तात्पुरत्या कारागृहातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे आहे. संबंधित आरोपी सुमारे 13 दिवस तात्पुरत्या कारागृहात होता. या कारागृहात सध्या 550 आरोपी आहेत. त्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने तेथील इतर आरोपींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

संबंधिताला जामीन झाल्याने आणि कारागृह प्रशासनाने परवानगी दिल्याने कुटुंबियांनी त्याची खाजगी रुग्णालयात रवानगी केली आहे. कोरोना बाधित असलेल्या या आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची 30 जूनला तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र कोरोना असल्याचे निदान झाल्याने जामीन मिळाल्यानंतरही त्याची 14 जुलै रोजी सुटका करण्यात आली नाही. त्यामुळे उपचारासाठी त्याला आमच्या हवाली करा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तपासणी करूनच येरवडा कारागृहात 
ज्या आरोपींना तात्पुरत्या कारागृहात 28 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत, अशा कैद्यांची तपासणी करून त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येते. तेथे देखील त्यांना वेगळे ठेवले जाते. त्यामुळे येरवडा कारागृहात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, असे येरवडा मध्यवर्ती कारागृहात अधीक्षक यु. टी. पवार यांनी सांगितले.

लक्षणे असलेल्या आणि बाधितांवर तात्पुरत्या कारागृहात उपचार केले जातात. इतर कैद्यांपासून त्यांना वेगळे ठेवण्यात येते. जास्तच त्रास होत असेल, तर त्यांना ससूनला पाठवण्यात येत आहे. सध्या तात्पुरत्या कारागृहातील कोरोना केअर वॉर्डमध्ये पाच पॉझिटिव्ह कैदी आहेत. लोणी-काळभोर पोलिस ठाण्यातील आरोपीला कोरोनाची लागण कुठे झाली हे माहित नाही, पण कारागृहात त्याचा प्रसार झालेला नाही. तेथील सर्वांच्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. 
- यु. टी. पवार, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधिक्षक 

30 जून रोजी आरोपीची ससूनमध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. मात्र जामीन झाल्यानंतर त्याला कोरोना असल्याचे समजले. दोन्ही कारागृहात सध्या शेकडो कैदी आहेत. या प्रकरणामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. 
- ऍड. विजयसिंह ठोंबरे, आरोपीचे वकील

- तात्पुरत्या कारागृहात सध्या 550 कैदी
- येरवडा कारागृहात सुमारे 4300 कैदी
- 28 दिवसानंतरच तात्पुरत्या कारागृहातुन येरवड्यात रवानगी
- येरवडा कारागृहात पाठवताना आरोपींची तपासणी
- कोविड केअर वॉर्डमध्ये 5 कोरोना बाधीत

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसचं आमंत्रण; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिल्लीत उच्चस्तरिय बैठक

Bank Layoff: IT नंतर आता बँकिंग क्षेत्रातही नोकरकपातीचं वादळ; AI आणि रोबोट्समुळे 7000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Private School Fees: खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Unseasonal Rain : रांजणगाव खुरी उरुसात अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्याने स्टॉल, रहाट पाळणे कोसळले, लाखोंचे नुकसान

Bhendala Assault Case: भेंडाळा गावात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला; छेडछाडीला विरोध केल्याचा संतापजनक परिणाम, प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT