Pune Onion farmers in trouble stored onions start to rot agriculture
Pune Onion farmers in trouble stored onions start to rot agriculture  sakal
पुणे

Pune : साठवणूक केलेला कांदा सडू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

पराग जगताप

ओतूर : ता.जुन्नर व परीसरातील गावामधील कित्येक शेतकऱ्यांचा चाळीत साठवणूक केलेला कांदा सडू लागला असून सध्या कांद्याला निच्चांकीच बाजारभाव मिळत असल्याने उत्पादन खर्च ही मिळेनासा झाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

ओतूर कृषी मंडल कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या ओतूर, उदापूर ,डिंगोरे ,नेतवड ,माळवाडी ,बल्लाळवाडी ,पिंपळगाव जोगा,कोळवाडी,वाटखळे,चिल्हेवाडी,पाचघर,आंबेगव्हाण, रोहोकडी व इतर गावात कांदा हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पिक उत्पादित केले जाते.या परीसरातील कांदा मार्च,एप्रिल महिन्यात काढणी करून शेतकरी आपला कांदा समाधानकारक बाजारभाव मिळेल या आशेवर चाळीत साठवणूक करून ठेवतो व हा कांदा पूना फुरसुंगी,रांगडा कांदा असे ही नावे असून कनेसर बियाण्यांचा कांदा ही टिकवण क्षमतेला चांगला असल्याचे आता पर्यंत कांदा उत्पादक शेतकर्यानी अनुभवले आहे.

मात्र यावर्षी अवकाळी पाऊस,हलक्या गारा,खराब हवामान यामुळे जो कांदा चाळीत साठवणूक करून शेतकरी ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात विक्रीसाठी काढतो तोच कांदा चाळीत साठवणूक केलेला असून मे महिन्यातच चाळीत कांदा सडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कांदा उत्पादक शेतकर्यापूढे अचानकच कांदा सडू लागल्याचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हतबल झाला आहे.आधीच अवकाळी पाऊस व खराब वातावरणाचा सामना करत पिकवलेला दर्जेदार कांदा या एप्रिल व मे च्या हिट मध्ये खराब होऊन लागल्याने शेतकऱ्यांपुढे नविनच संकट उभे राहिले आहे.

त्यातच कांद्याला फेब्रुवारी पासून जे निच्चांकीच बाजारभाव मिळत आहे ते मे महिना संपत आला तरी निच्चांकीच आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून आता साठवणूक केलेला कांदा जर चाळीत खराब होऊ लागला आहे तर मिळेल त्या बाजारभावात हा कांदा विकावा लागणार आहे.एकूणच या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांला कांदा आता पासूनच रडणार असल्याचे दिसून येत आहे .

उदापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी ज्ञानदेव छबूराव अमूप यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही कांदा चाळीत साठवणूक केला.दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान कांदा विक्री ते करतात.मात्र यावर्षी त्यांच्या कांदा चाळीतील कांदे सडून खाली काळे पाणी पडू लागल्यामुळे त्याने कांदाचाळ उघडून कांदे भरण्यास सुरूवात केली.

त्यात दोन गाण्यातील कांदे सडून खराब झाल्याने त्यातून चांगले कांदे निवडून इतर खराब कांदे फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.तसेच आता कांद्याला निच्चांकीच म्हणजे सात ते नऊ रूपये एक नंबर कांद्याला बाजारभाव मिळत असल्याने कांद्याचा उत्पादन खर्च भागणार नसल्याने कांदा उत्पादित करून आर्थिक तोटाच होत आहे.

तसेच शेकर्यानी चाळीत साठवणूक केलेल्या कांदाचा जर खराब वास येत असेल तर कांद्या खराब झालेत का ते तपासून पहावे असे मत कांदा उत्पादक शेतकरी व उदापूरचे माजी सरपंच प्रदीप अमूप व ज्ञानदेव अमूप यांनी व्यक्त केले आहे.

शासनाने चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला कमीत कमी पन्नास रूपये किलोला हमीभाव जाहिर करावा.तसेच सरकारने फेब्रुवरी ते मार्च महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला किलोला ३.५ रूपये अनुदान जाहिर केले.मात्र त्यानंतर ही कांद्याचे बाजारभाव आज पर्यंत निच्चांकीच राहिले असून

सरकारने एप्रिल व मे महिन्यात ही विक्री झालेल्या कांद्याला कमीत कमी दहा रूपये किलोला अनुदान जाहिर करावे अशी मागणी कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार थोरात,माजी जि.प.सदस्य अंकुश आमले,बबन तांबे,मोहित ढमाले यांनी परीसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकर्याच्या वतीने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT