Pune Road Sakal
पुणे

पुणे : नदीपात्रातील रस्ता बंदनंतर हे आहेत पर्याय

नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत नदीपात्रातील रस्ता कायमस्वरूपी काढून टाकला जाणार आहे. त्यास पर्याय म्हणून महापालिकेच्या विकास आराखड्यात समावेश असलेला मार्ग विकसित केला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत नदीपात्रातील रस्ता कायमस्वरूपी काढून टाकला जाणार आहे. त्यास पर्याय म्हणून महापालिकेच्या विकास आराखड्यात समावेश असलेला मार्ग विकसित केला जाणार आहे.

पुणे - नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत नदीपात्रातील रस्ता (River Basin Road) कायमस्वरूपी काढून टाकला जाणार आहे. त्यास पर्याय म्हणून महापालिकेच्या (Municipal) विकास आराखड्यात (Development Plan) समावेश असलेला मार्ग विकसित केला जाणार आहे. डेक्कन येथील सावरकर स्मारकापासून गरवारे महाविद्यालयाच्या परिसरातून हा रस्ता सुरु करून तो म्हात्रे पुलावर आणला जाणार आहे. मात्र, परिसरातील वस्ती आणि खासगी मिळकतींमुळे भूसंपादन करून हा रस्ता विकसित करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.

महापालिकेतर्फे मुळा मुठा नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या दोन टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन हा ३५० कोटींचा, तर बंडगार्डन ते मुंढवा हा ६०० कोटींचा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांत नायडू मैलाशुद्धीकरण केंद्रापासून ते मुंढव्यापर्यंत नदीच्या बाजूने ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे.

या भागांतील रहिवाशांची गैरसोय

डेक्कन ते म्हात्रे पूल या दरम्यान सध्याचा नदीपात्रातील रस्ता हा निळ्या रेषेच्या आत आहे. तो रस्ता बंद केल्यास कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, खडकवासला, उत्तमनगर, शिवणे यासह इतर भागातील लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

केळकर रस्त्यावर वर्दळ वाढणार

नदी सुधार प्रकल्पात बाबा भिडे पूल काढून टाकला जाणार आहे. तसेच जयंत टिळक पुलापासून ते भिडे पुलापर्यंतचा रस्ताही काढून टाकला जाणार आहे. त्यास पर्यायी मार्ग म्हणून केळकर रस्ता हाच एकमेव रस्ता आहे. महापालिकेने २०१७च्या विकास आराखड्यात या रस्त्यावर रुंदीकरण टाकले होते. मात्र, राज्य सरकारने ते काढून टाकल्याने हा रस्ता आहे तसाच राहणार आहे. पुढील तीन चार वर्षांत टिळक पूल ते म्हात्रे पूलादरम्यान नदी सुधारचे काम सुरू झाल्यानंतर केळकर रस्त्यावर वर्दळ वाढणार आहे.

तीस वर्षांपासून रस्ता प्रस्तावित

महापालिकेच्या १९८७ आणि २०१७च्या विकास आराखड्यात कर्वे रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथून म्हात्रे पुलापर्यंत ३० मीटर रुंद रस्ता दाखविण्यात आला आहे. तो शिवणे-खराडी या मार्गाला जोडणारा प्रस्तावित रस्ता आहे. मात्र, गेल्या ३० वर्षात याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. नदी सुधारच्या निमित्ताने हा मोठा रस्ता विकसित होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

तीन पुलांचा होणार अडथळा

नदी सुधार करताना डेक्कन ते म्हात्रे पुलापर्यंत रस्ता सुशोभित करताना दोन्ही बाजूने पिचिंग केले जाणार आहे. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, उद्यान, सायकल ट्रॅक अशी आखणी असेल. डेक्कन ते म्हात्रे पूल हा ३० मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग तयार केला जाईल. पण या दरम्यान यशवंतराव चव्हाण पूल, एस. एम. जोशी पूल आणि म्हात्रे पूल, असे तीन पूल येतात. या तिन्ही पुलांवरून हा मार्ग पुढे कसा जाणार, त्यासाठी नदीपात्रात इलोव्हेडेट पूल बांधले जाणार की नदीवरील पुलांच्या खालून रस्ता जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हा रस्ता गरवारे महाविद्यालय, सेंट्रल मॉलच्या पाठीमागून रजपूत झोपडपट्टी येथून जाणार असल्याने काही भूसंपादन करावे लागणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

तुम्हाला काय वाटते...

नदीपात्रातील रस्ता काढून त्यासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात समावेश असलेला रस्ता पर्यायी मार्ग म्हणून विकसित केला जाणार आहे. याबाबत आपले मत नावासह व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवा...

क्रमांक- ८४८४९७३६०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT