School sakal
पुणे

Pune : कोरोनानंतर शाळा सुरू होत असल्याने पालक-बालक शिक्षकही समाधानी

दप्तर, गणवेश खरेदीची धांदल; रिक्षा-स्कूल बसचालकांचीही स्वच्छता मोहीम सुरू

अशोक बालगुडे

पुणे (उंड्री) : कोरोना महामारीमुळे बंद झालेल्या शाळा तब्बल पावणेदोन वर्षानंतर सुरू होत असल्याने पालक-बालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मुलांना नवीन दप्तर, गणवेश खरेदी करीत, रिक्षा, स्कूल बस अशा सर्व बाबींची तयारी सुरू झाली आहे. शाळा सुरू होणार असल्याने चिमण्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला आहे.

दरम्यान, शाळा प्रशासनाबरोबर चिमुकल्यांना शाळेत पोहोचविणाऱ्या स्कूल बसचालक आणि रिक्षाचालकांनीही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. हवेली तालुक्यातील उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, वडकी, वडाचीवाडी, हांडेवाडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर खासगी शाळांनीही स्वच्छता करीत मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मागिल आठवड्यात दै. सकाळमध्ये सांग सांग भोलानाथ शाळा सुरू होईल का अशी चिमण्यांची आर्त हाक दिली होती. ती खरी ठरली अशीही टिप्पणी पालकांनी दिली. मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना आता शाळेमध्ये खडू-फळा अभ्यास करीत सवंगड्यांबरोबर मस्ती करायला मिळणार आहे.

पिसोळीतील महात्मा ज्योतिराव हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत काळे म्हणाले की, मुलांचे दररोज डबा, दप्तर, गणवेश ठिकठाक करीत रिक्षा किंवा स्कूलबसच्या थांब्यापर्यंत जायचे. पहिल्या दिवशी शाळेत जाऊन शिक्षकांची भेट घ्यायची आणि मुलांकडे लक्ष द्या, असे सांगायची पालकांना घाई झाली आहे. शाळा दुसऱ्या सत्रात सुरू होणार असली, तरी मुलांची चांगली तयारी होईल, असा विश्वास पालकवर्गातून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

चिमुकल्यांनी शाळाच पाहिली नव्हती, ती मुले आता शाळेत जाताना पाहावयास मिळणार आहेत. वर्गात नवीन सवंगडी भेटणार आहेत, नवे दप्तर, नवी पुस्तके घेत वर्गाकडे मुले झेपावरणार आहेत. मोबाईलच्या स्क्रीनकडे गुंतलेली मुले आता पुन्हा पुस्तकामध्ये रममाण होणार आहेत. मोबाईलवरील नाईट नाही, तर पुस्तक आणि फळ्यावरील अक्षरे वाचणार आहेत. मोबाईलवरील बडबड गीताऐवजी आता थेट बडबड गीते म्हणार आहेत, याचा आनंद त्यांच्यासाठी मोठा असणार आहे, असे पिसोळीतील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला पासलकर यांनी सांगितले.

महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ म्हणाल्या की, प्रदीर्घ सुटीनंतर शाळा सुरू होणार असल्याने पालक आणि बालकांबरोबर शिक्षकही समाधानी दिसत आहेत. मुलांना केंद्रबिंद मानून शिक्षक कार्यरत असतात. शाळा सुरू झाली पाहिजे, असे सर्वांना वाटत होते, त्याबाबत एकदाचा निर्णय झाला ही बाब समाधानकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार आहे, शाळा परिसराची स्वच्छता केली आहे. स्कूल चले हम असा गलका करीत मुले शाळेत येणार आणि आम्ही त्यांचे जल्लोषात स्वागत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT