Pune Sakal
पुणे

Pune : वाघोलीत प्रवाशांची दलदलीतून सुटका होणार, कॉक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन

काही वर्षा पूर्वी महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन पी एम पी एल ला बी आर टी बस स्थानकासाठी दिली. मात्र त्या जागेचा विकास केला नाही.

सकाळ डिजिटल टीम

Pune - पावसाळ्यात अनेक वर्षांपासून चिखल तुडवीत बस पकडणार्या प्रवाशांची आता या त्रासातून मुक्तता होणार आहे. येथील केसनंद फाट्यावरील बी आर टी बस स्थानक जागेचे काँक्रीटीकरण काम सहा ते आठ महिन्यात होणार आहे. आमदार अशोक पवार यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले.

काही वर्षा पूर्वी महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन पी एम पी एल ला बी आर टी बस स्थानकासाठी दिली. मात्र त्या जागेचा विकास केला नाही. त्या जागेत पावसाळ्यात चिखल होत असल्याने चिखल तुडवीत प्रवाशांना बस पकडावी लागत होती.

प्रवाशांचे खूप हाल होत होते. येथून 12 मार्गावर बसेस सुटतात. प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. या जागेचा विकास करावा अशी प्रवाशांची मागणी होती. आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेऊन पी एम आर डी

ए कडे या जागेचा विकास करण्याची मागणी केली होती. त्यासाठी पी एम आर डी ए ने दोन कोटी 75 लाख रुपयांची तरतूद केली. या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी माजी सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, राजेंद्र सातव, बाजार समिती सदस्य रामकृष्ण सातव, सुनील जाधवराव, प्रसाद केळकर, धर्मेंद्र सातव, पी एम पी एल वाघोलीचे व्यवस्थापक सोमनाथ वाघेले, चालक, वाहक, नियंत्रक उपस्थित होते.

असा असेल या जागेचा विकास

1) 4500 चौ मी चे काँक्रीटीकरण

2) तीन बाजूला सीमाभिंत

3) चढ उतार कमी करून जागा समांतर करणे

4) धावपट्टीचे मजबुतीकरण

5) सूचना फलक व अन्य कामे

6) सहा ते आठ महिन्यात काम पूर्ण होणार.

बस स्थानक समोर स्थलांतर होणार ?

या जागेचे काँक्रीटीकरण केले जात असल्याने बस थांबण्यासाठी अडचण होणार आहे. यासाठी सहा महिने बस स्थानक समोरील मोकळ्या जागेत स्थलांतर करण्याची पी एम पी एल ची योजना आहे. तसे पत्र पी एम पी एल महापालिकेला देणार आहे.

महापालिकेनेही येथील जागेच्या डांबरीकरणासाठी 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र आता काँक्रीटीकरण होणार असल्याने हा निधी सीमाभिंतीच्या मागील 24 फूट रस्त्याच्या विकासासाठी वापरावा अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT