Vidya-Balan sakal
पुणे

Actress Vidya Balan : ‘स्त्रीकेंद्री चित्रपटांविषयीचा दृष्टिकोन बदलायला हवा’

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत बालन यांनी ‘मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींसमोरील आव्हाने’ या विषयावर संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत बालन यांनी ‘मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींसमोरील आव्हाने’ या विषयावर संवाद साधला.

पुणे - बदलत्या काळासह खऱ्या आयुष्यात स्त्रियांचे स्थान बदलले, तसेच ते चित्रपटातही बदलू लागले. स्त्रियांसाठी उत्तम भूमिका लिहिल्या जाऊ लागल्या, त्या केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटही निर्माण होत आहेत. मात्र, ते मोठ्या पडद्यावर यशस्वी होतील का, याबाबत साशंकता असल्याने हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यास पसंती दिली जाते. हा दृष्टिकोन बदलण्याचे आव्हान आज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी बुधवारी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत बालन यांनी ‘मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींसमोरील आव्हाने’ या विषयावर संवाद साधला. याप्रसंगी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. बालन म्हणाल्या, ‘‘पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना काहीशा दुय्यम भूमिका मिळतात, हे मला मान्य आहे. परंतु, पुरुषांच्या वाट्याला सहसा कथेचा नायक किंवा परिस्थितीचा बळी, अशा दोन टोकाच्याच भूमिका येतात. याउलट स्त्रियांना वैविध्यपूर्ण छटा असलेल्या भूमिका साकारायला मिळतात. मलाही कायम स्वतःला आव्हान देणारी भूमिका साकरायला आवडते.’’

अभिनय क्षेत्रातील वाटचालीचा प्रवासही बालन यांनी उलगडला. ‘मी आठ वर्षांचे असताना, माधुरी दीक्षित यांचे ‘एक, दो, तीन...’ या गाण्यावरील नृत्य पाहिले आणि तेव्हाच या क्षेत्रात यायचा निश्चय केला. मी अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले नाही, निरीक्षणातून शिकत गेले. या प्रवासीत अतिशय खडतर काळही अनुभवला, तीन वर्षात तब्बल बारा चित्रपटांतून मला वगळण्यात आले. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली आणि ‘परिणीता’, ‘इश्किया’, ‘कहानी’, ‘डर्टी पिक्चर’ असे अनेक दर्जेदार चित्रपट मला मिळाले.’

‘आमचे काम मनोरंजनाचे’

राजकीय-सामाजिक परिस्थितीबाबत मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती भाष्य का करत नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण कलाकारांनीच हे भाष्य का करावे? लोकांचे मनोरंजन करणे, हे कलाकारांचे काम आहे. राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे काम राजकारण्यांचे आहे, ते त्यांनीच करावे, असे स्पष्ट प्रतिपादन विद्या बालन यांनी केले.

उपदेश करणारे चित्रपट किंवा प्रपोगंडा चित्रपट करायला मला आवडत नाही. चांगली कथा मांडताना त्यातून संदेश दिला जाणार असेल, तर हरकत नाही. कारण चित्रपटाचा मूळ हेतू रंजन असावा, असे मला वाटते. मी भूमिका स्वीकारतानाही याचा विचार करते. ज्या चित्रपटात माझ्या अस्तित्त्वाने फरक पडणार असेल, तोच चित्रपट मी स्वीकारते.

- विद्या बालन, प्रसिद्ध अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT