Offices In Pune Closed Due to Rain Esakal
पुणे

Pune Offices Closed: पुणेकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे शाळांच्या पाठोपाठ ऑफिससुद्धा राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली सुट्टी

Pune Schools: राज्यातील विविध भागासह पुण्याला पाऊस झोडपत आहे. अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती.

आशुतोष मसगौंडे

राज्यातील विविध भागासह पुण्याला पाऊस झोडपत आहे. अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आदेश दिले आहे. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून, यामुळे विविध भागांतील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

यासह मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिंहगड रोड आणि कामगार पुतळ्यासह बऱ्याच भागात पाणी शिरल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

दुसरीकडे शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरातही पाणीच पाणी झाले आहे. कारण मुठा नदीकाळी असलेल्या मंदीरवर खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे परिणाम झाला आहे.

या सर्व परिस्थितीनंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, "पुणे आणि परिसरात पाऊस सुरू आहे. यामुळे शहराचा बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साठले आहे. याखेरीज काही सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत मी स्वतः जिल्हाधिकारी,पुणे आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. ज्या नागरीकांना मदतीची गरज आहे तिथं प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत. नागरीकांना देखील विनंती आहे की, अत्यंत महत्वाचे व गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे."

या सर्व परिस्थितीत पुण्याचे जिल्हाधिकार डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व सुत्रे हाती घेतल थेट आपत्ती व्यवस्थापन कक्ष गाठत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यानंतर त्यांनी आवश्यक आदेश उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Ayodhya Ram Mandir Flag : राम मंदिरात PM मोदी करणार ध्वजारोहण; सहा हजार पाहुणे होणार सहभागी, कशी आहे सुरक्षा व्यवस्था ?

Viral News : मंदिरात जाताच अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले १६ हजारांचे शूज, संतापलेल्या इंजिनिअरला पुजाऱ्याकडून मिळाले 'हे' उत्तर

Latest Marathi Breaking News : बुलढाण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

SCROLL FOR NEXT