PMP Bus Sakal
पुणे

पुणे-पिंपरीत रविवारी पीएमपीच्या जादा ३०० बस

वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राखी पौर्णिमेला (rakhi purnima) पीएमपीच्या (PMPML) उत्पन्नात दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेऊन पीएमपीने पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) प्रवाशांसाठी रविवारी जादा ३०० बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही शहरांत दरवर्षी राखी पौर्णिमेला मोठ्या संख्येने प्रवासी पीएमपीच्या बसने प्रवास करतो. त्यामुळे यंदाही पीएमपीने जादा ३०० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण १४२५ बसेसचा ताफा मार्गावर असेल. त्यासाठी वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.

२३ ऑगस्टलाही पीएमपीने जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणे कामी व वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT