Pune Police officers taking strict action against members of the Koyta Gang as seen in a viral public confrontation video.
esakal
Pune Police Take Action Against Koyta Gang Members Video Viral : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये मग मारहाण, गँग वॉर, खून, लुटमार किंवा मग धमकावण्याचेही प्रकार आपल्याला आढळतात. याशिवाय, पुण्यात कोयता गँग देखील धुडगूस घालत असल्याचे आपल्याला विविध घटनांमधून दिसते. मात्र आता पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशांची मस्ती जिरवल्याचीही एक घटना समोर आली आहे.
रात्री-बेरात्री फिरून नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करणे, एखाद्यावर कोयत्याने हल्ला करणे आणि धमकावणे अशा घटना वारंवार घडत असल्याने पुणे पोलिसांच्या रडारावर या कोयता गँगचे बदमाश आलेले होते. शिवाय, नागिरकांकडूनही पुणे पोलिसांचा काही वचक राहिला आहे की नाही? असे प्रश्न उपस्थित होत होते.
या पार्श्वभूमीवरच कोयता गँगच्या बदमाशांना पकडून पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार पोलिसांनी या बदमाशांना पकडलं आणि मग थेट नागरिकांसमोरच बेदम चोपलं देखील. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती. शिवाय कित्येकजण पोलिसांची ही कारवाई मोबाइलमध्येही रेकॉर्ड करत होते.
तर एकीकडे कोयता गँगच्या बदमाशांना पोलिस कर्मचारी बेदम चोपत असताना, दुसरीकडे पोलिस अधिकारी नागरिकांशी संवाद साधून त्यांना या कारवाईबाबत आपण समाधानी आहात का असेही विचारत होते. शिवाय, यापुढेही जर कोणी दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करणार असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, असा इशाराही पोलिस अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
एवढंच नाहीतर कोयता गँगच्या बदमाशाला बेड्या ठोकून सोबत आणले आणि नागरिकांनी अशा कोणत्याही बदमाशाला घाबरून जावू नये असे सांगितले. तसेच, पोलिस अधिकाऱ्याने त्याचा वैयक्तित मोबाइल नंबर देवून कधीही संपर्क साधण्याचे नागरिकांना आवाहन देखील केली. पुणे पोलिसांच्या या धडाकेबजा कारवाईचे आता चांगलेच कौतकही होवू लागले आहे. शिवाय, या कारवाईचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.