पुणे : परराज्यात आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली जात आहे. शनिवारी (ता.9) सुमारे 24 हजार जणांना पुणे पोलिसांनी प्रवास करण्यास परवानगी दिली. त्यामुळे हजारो जणांना आपल्या गावाची वाट आता दिसू लागली आहे.
कोरोनामुळे लागू केलेल्या संचार मनाई आदेशामुळे मागील दीड महिन्यापासून लाखो परप्रांतीय कामगार, बांधकाम मजूर, विद्यार्थी, पर्यटक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक शहरामध्ये अडकून पडले होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने परराज्यात व राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊ इच्छिणाऱ्या नागरीकांचा परतीचा मार्ग मोकळा केला होता.
त्यामुळे नागरीकांकडून गावी परतण्यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांकडून प्रवासी नागरीकांचे ऑनलाईन अर्ज मागवून पोलिस ठाण्यांपासून ते पोलिस उपायुक्त कार्यालयापर्यंत विविध पातळींवर योग्य काळजी घेऊन त्यांना परवानगी देण्यात येत आहे.
शनिवारी पुणे पोलिसांनी 23 हजार 848 इतक्या नागरीकांना गावी जाण्यासाठी परवानगी दिली. त्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक असलेल्या 854 व्यक्ती, तत्काळ वैद्यकीय उपचारांसाठी 3 हजार 612 जणांना, तर 7 हजार 174 विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी परवानगी दिली.
याबरोबरच 10 हजार 587 जणांना वैयक्तीक कारणासाठी व 2 हजार 197 अन्य कारणांसाठी अशा एकूण 23 हजार 848 जणांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.
डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून परराज्यात जाणाऱ्या 250 नागरीकांना डेक्कन पोलिसांनी जेवण, नाश्ता, मास्क, सॅनिटायझर अशा वस्तू देण्यात आल्या. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी परराज्यातील प्रवाशांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक लगड व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.