Crime_Transgender 
पुणे

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील गर्दीच्या चौकांमधील सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरीकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी 13 तृतीयपंथीयांविरुद्ध कारवाई केली. 

पुणे-सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई-पुणे रस्ता तसेच शहराच्या उपनगरांमधील महत्वाच्या चौकातील सिग्नलला वाहनचालक थांबल्यानंतर तृतीयपंथीय समूहाने येऊन वाहनचालकांकडे पैसे मागण्याचे प्रकार शहरात मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. बहुतांश तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांना धमकावून पैसे घेण्याच्याही घटना घडत होत्या. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना याबाबतची माहिती मिळाली होती. तसेच काही नागरीकांनीही पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. 

या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी संबंधीत तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येरवड्यातील सादलबाबा चौकात 3, हडपसर येथील लोणी टोलनाका येथे 3, बंडगार्डन परिसरातील घड्याळ चौक 2 , सारसबागेजवळील चौकात 3, पौड रस्त्यावरील करिश्‍मा सोसायटी चौक 2 येथे चौकांमध्ये कारवाई केली. वाहनचालकांची वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी 13 तृतीयपंथीयांविरुद्ध महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT