Pune Crime Sakal media
पुणे

पुणे : अंत्ययात्रेत सहभागी झालेले 80 जण पोलिसांच्या ताब्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी 20 ते 25 जणांना परवानगी देण्यात येते, मग गुंडाच्या अंत्ययात्रेसाठी पोलिसांनी विशेष सवलत दिली काय? असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी 20 ते 25 जणांना परवानगी देण्यात येते, मग गुंडाच्या अंत्ययात्रेसाठी पोलिसांनी विशेष सवलत दिली काय? असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित करण्यात आला होता.

पुणे : सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढत त्यामध्ये 100 ते 125 दुचाकीच्या माध्यमातून 200 जणांनी सहभाग घेतल्याच्या घटनेनंतर उशिरा जाग आलेल्या पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतले असून 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. सहकारनगर येथील सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) याचा शुक्रवारी (ता.14) मध्यरात्री बिबवेवाडी येथे खून करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (ता.15) दुपारी 12 वाजता त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Pune Police arrested 80 peoples who attending funeral of criminal)

दरम्यान, सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर त्याच्या घराच्या परिसरात गर्दी होण्याची तसेच त्याच्या अंत्यसंस्कारप्रसंगी त्याचे साथीदार मोठ्या प्रमाणात जमा होण्याची दाट शक्यता असतानाही सहकारनगर पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरात संचारबंदी असतानाही तसेच ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी असतानाही वाघाटेची अंत्ययात्रा काढण्यात आली.

या अंत्ययात्रेत 100 ते 125 दुचाकी सहभागी झाल्या होत्या. दुचाकी रॅलीमध्ये अंत्ययात्रा निघाली. तरीही त्याबाबत पोलिसांना खबर नव्हती. त्याचबरोबर नाकाबंदी ठिकाणीही या रॅलीला पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे विरोध करण्यात आला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी 20 ते 25 जणांना परवानगी देण्यात येते, मग गुंडाच्या अंत्ययात्रेसाठी पोलिसांनी विशेष सवलत दिली काय? असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित करण्यात आला होता.

अखेर परिमंडळ दोनचे पोलिस आयुक्त सागर पाटील यांनीच या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर रविवारी 200 जणांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 दुचाकी जप्त केल्या.

"रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करून अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणाऱ्याची धरपकड सुरू आहे. पुणे पोलिसांच्या 15 पथकांकडून आरोपी तसेच वाहने ताब्यात घेण्यात येत आहेत."

- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT