Crime_Murder
Crime_Murder 
पुणे

'तू रोज फुकटची दारू पितो' वरून झालं भांडण; वादात दोन मित्रांचा खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दारूच्या वादातून लोखंडी पट्टीने दोघांचा खून करणाऱ्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. अनिल रतन कचरावत (वय 47, रा. कोंढवा गंगाधाम रस्ता, बिबवेवाडी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. 

या प्रकरणी पोलिस हवालदार विश्वनाथ नामदेव शिंदे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. सलीम मेहबूब शेख (वय 45, रा. लेकटाउन, कात्रज) आणि तौफिक शेख (वय 36, रा. काकडे वस्ती, बिबवेवाडी) अशी खून झालेल्या व्यक्तींची नाव आहेत.

खून झालेल्या व्यक्ती आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. सलीम शेख आणि आरोपी हे कोंढवा गंगाधाम रस्त्यावरील जय मल्हार हॉटेलमध्ये कामाला होते. तर तौफिक शेख हा नेहमी चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये येत असत. शुक्रवारी (ता.25) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सलीम श्रीजी लॉन्ससमोर गल्लीत बसला होता. त्यावेळी तेथे आलेल्या अनिलने दारुवरुन त्याच्यासोबत वाद घातला. तू रोज फुकटची दारू पीत असल्याच्या आरोप करून, इमारत बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी पट्टीने अनिलने सलीमच्या डोक्‍यात वार केले. यात सलीमचा मृत्यू झाला.

अनिल आणि सलीम यांच्या वाद सुरू असताना सलीमला जेवणाचा डबा घेऊन तौफिक तेथे आला होता. त्याने अनिलने सलीमला मारताना पाहिले होते. त्यामुळे अनिलने तौफिकचा पाठलाग करून त्याच्या डोक्‍यातही पट्टीने वार केला. गंभीर जखमी तौफिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील भानुप्रिया पेटकर यांनी न्यायालयात केला. त्यानुसार त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT