Pune Police, chain snatching, Pune
Pune Police, chain snatching, Pune 
पुणे

पुण्यात टोळीनं सामान्यांना लुटणारी गँग गजाआड; 'मोक्का'अंतर्गत कारवाई 

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे : सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांवर चतुःशृंगी पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. आरोपी संघटीत टोळी करून त्याद्वारे सोनसाखळी चोरी, जबरी चोरी,बॅग पळविणे यांसारखे गुन्हे शहरामध्ये करीत होते. राजाभाऊ ऊर्फ राजुखेमू राठोड (वय 36, रा.चंदननगर, वडगाव शेरी, मुळ रा. एकंबीतांडा, लातूर), नागेश रामप्पा बंडगर (वय 34, रा.रायबाग, बेळगाव, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

बाणेर येथे 3 ऑक्‍टोबर 2020 या दिवशी रिक्षा प्रवासी त्याच्या कोथरुड येथील घरी जाण्यासाठी रिक्षा थांबवित होता. त्यावेळी रिक्षावाल्याने मीटरप्रमाणे येईल, असे म्हटल्याने प्रवाशाने त्यास नकार दिला. रिक्षा वळत असतानाच दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील लॉकेटसह 12 ग्रॅम वजनाची व 36 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने चोरुन नेली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणाचा तपास करून चतुःशृंगी पोलिसांनी राठोड व बंडगर या आरोपींना अटक केली. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली, त्यावेळी आरोपी राठोड हा संघटीतपणे टोळी तयार करून सोनसाखळी चोरी, जबरी चोरी,बॅग पळविणे यांसारखे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी कटकारस्थान रचून अन्य आरोपींना आर्थिक मदत पुरवून बाणेर परिसरामध्ये वर्चस्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निष्पन्न झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावेळी संबंधीत आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांना पाठविला. चव्हाण यांनी छाननी करून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीने संबंधीत प्रस्तावाला मंजुरी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT