Crime_Pistol 
पुणे

पुणे : पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच लाख पळवणारा पोलिसांच्या जाळ्यात; साथीदार फरार

सकाळ वृत्तसेवा

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळीतील एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) बुधवारी (ता.१७) ताब्यात घेतले आहे. रामधन भागीरथी विश्वकर्मा (वय 39, रा. संतोषनगर कात्रज, मूळ रा. लालगंज, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. तर इतर दोन आरोपी फरारी आहेत.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून माहिती मिळाली. आठ दिवसांपूर्वी खेड-शिवापूर येथील पेट्रोल पंपावर अज्ञात इसमांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे अडीच लाख रुपयांची लूट केली होती. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना संतोषनगर, कात्रज येथील रामधन विश्वकर्मा याच्या घरी उत्तर प्रदेशची दोन मुले आली होती आणि त्यांच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती 'एलसीबी'ला  मिळाली होती.

त्यानुसार 'एलसीबी'ने रामधन विश्वकर्मा याला बुधवारी दत्तनगर, कात्रज येथून ताब्यात घेतले. यावेळी त्याने राजसिंग उर्फ राजकुमार (वय 20, रा. कबरा, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) आणि सूरज कुमार (वय 18, रा.कबरा, उत्तरप्रदेश) यांच्यासह मोटार सायकलवर जाऊन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार विश्वकर्मा याला पुढील तपासासाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर राजसिंग आणि सूरजकुमार हे दोघेजण फरार आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली 
फौजदार अमोल गोरे, पोलिस नाईक राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, अक्षय नवले, अक्षय जावळे, प्रमोद नवले, राजेंद्र थोरात, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गुरू जाधव, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT