Whatsapp 
पुणे

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवले हत्यारांसह फोटो; दत्तवाडीतील दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि तीक्ष्ण हत्यारांचे फोटो ठेवणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. समाज माध्यमावर हत्यारांसह फोटो प्रसारित करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली म्हणून सराईतासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अमर लक्ष्मण गायकवाड (वय २३, रा. जनता वसाहत) आणि भीमा शत्रुघ्न शिंदे (वय २२, वाघजाई मित्रमंडळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दत्तवाडीत दोघेजण व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला तलवारी आणि घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्याकडे हत्यार असल्याची माहिती पोलिस हवालदार कुंदन शिंदे आणि प्रमोद भोसले यांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर आणि पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, कर्मचारी प्रमोद भोसले, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर आणि बजरंग पवार यांच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडील तलवार आणि पालघन जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींमधील गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. तो काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपला सतत शस्त्राचे फोटो ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

Gautala Ghat accident news: गौताळा घाटात ऊसतोड मजुरांचा टेम्पो दरीत कोसळला; १३ जखमी, ७ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT