Amitesh Kumar Esakal
पुणे

Pune Porsche Accident: 3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले; अमितेश कुमारांचा धक्कादायक खुलासा

Pune Police Commissioner Amitesh Kumar: ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- कल्याणीनगर अपघाताप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे.

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे ब्लड गोळा करण्यात आले होते, ते दुसऱ्या व्यक्तीचे होते. तेच ब्लड फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. आरोपीचे ब्लड सॅम्पल ससूनच्या डॉक्टरांनी घेऊन ते डस्टबीनमध्ये फेकले. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले, असा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे.

श्रीहरी हरलोर यांनी ब्लड सॅम्पल घेतले आणि रिप्लेस केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. अजय तावरे याला देखील अटक करण्यात आली होती. तावरे याच्या आदेशानेच हरलोर याने काम केले आहे. आम्हाला शंका असल्याने आरोपीचे ब्लड सॅम्पल आम्ही औंधच्या हॉस्पिटलला देखील पाठवले होते, असं आयुक्त कुमार म्हणाले.

औंध येथे पाठवण्यात आलेले ब्लड सॅम्पल हे त्याचेच असल्याचा रिपोर्ट काल आला आहे. आरोपीच्या वडिलांसोबत त्याचे ब्लड सॅम्पल मॅच झाले आहे. पण, ससूनच्या ब्लड सॅम्पसोबत वडिलांचे सॅम्पल मॅच झाले नव्हते. त्यामुळे यात फेरफार झाल्याचं आम्हाला दिसून आलं. त्यामुळे आम्ही दोन डॉक्टरांची अटक केली आहे. ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले आहेत, असं ते म्हणाले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. शिवाय यात प्रशासनाचे हात कसे वाईट कामात गुंतलेले होते हे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी येरवडा पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्यावर कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. डॉक्टर हरलोर याने ३ लाख रुपये घेऊन रिपोर्ट बदलला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT