pune police sakal
पुणे

पुणे पोलिसांची कमाल, गणेशोत्सवाची निर्विघ्नपणे सांगता !

पुणे पोलिसांनी गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या दिवशी चोख बंदोबस्त करीत कमाल केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात गेल्या काही दिवसातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे टिकेचे धनी झालेल्या पुणे पोलिसांनी गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या दिवशी चोख बंदोबस्त करीत कमाल केली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या चार-पाच दिवसातील गर्दी पाहून आता पुढे काय होणार, याचे उत्तर पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाचे शेवटचे पाच दिवस आणि विसर्जनाच्यादिवशी सुक्ष्म नियोजनाद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवत "बेसिक पोलिसींग' काय असते हे प्रत्यक्षात उतरवुन दाखविले.

शहरात मागील काही दिवसात सामुहिक बलात्कार, खुन, दरोडे यांसारखे अनेक गंभीर प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टिका केली जात होती. त्याचवेळी गणेशोत्सव सुरू झाला. सुरुवातीच्या पाच दिवसातच मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. कोरोनाला निमंत्रण देणारी हि गर्दी ह्दयात धडकी भरत होती. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या शेवटच्या चार-पाच दिवसात आणि विसर्जनाच्या दिवशी काय स्थिती असेल, याविषयी नागरीकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी शेवटच्या चार-पाच दिवसात जोरदार सुक्ष्म नियोजन करून, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करीत त्या चर्चेला योग्य उत्तर दिले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी सुरुवातीपासूनच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. डॉ.शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाच्या 10 ते 15 दिवस आगोदरच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना उत्सवातील "पोलिसींग'चे महत्व पटवून देण्याबाबत मार्गदर्शन सुरू होते. त्याचबरोबर डॉ.शिसवे, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, सतीश गोवेकर यांनी मंडळांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांनाही गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. पोलिस त्यामध्ये प्रारंभीच्या दिवसात रस्त्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी वाहतुक सुरळीत ठेवून पदपथावरुन नागरीकांना जाण्यासाठी व्यवस्था केली. त्यानंतर मोबाईल फोन काढून सेल्फी, छायाचित्रे घेणाऱ्यांना रोखले.

तसे करताना आढळल्यास मोबाईल जप्त होतील, असा इशाराही दिला. त्याचबरोबर नागरीकांनी मध्यवर्ती भागात गर्दी करू नये, यासाठी ठिकठिकाणी लाऊड स्पिकरची व्यवस्था करून त्याद्वारे योग्य सुचना देण्यास सुरूवात केली. चौका-चौकातील पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दर तासाचे संबंधीत रस्त्यावरील गर्दीचे व्हिडीओ, छायाचित्रे पाठविण्यास सांगितले जात होते. त्यानंतर शेवटच्या पाच दिवसात गर्दी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन ठिकठिकाणी रस्ते बंद करून वाहतुक वळविली. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांनाही माघारी पाठवित गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

10 तासांचा विसर्जनाचा चोख बंदोबस्त

रविवारी विसर्जनाच्या दिवशी मानाच्या व प्रमुख मंडळांच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे पोलिसांनी पाच टप्प्यांवर बॅरीकेडस्‌चे कुंपन उभे केले. ठिकठिकाणी अडथळे व पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीमुळे नागरीकांना मंदिरांपर्यंत पोचता आले नाही. मध्यवर्ती भागात राहणाऱ्या व्यक्ती, मंडळांचे कार्यकर्ते वगळता बाहेरच्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यातच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अतिरीक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सकाळपासूनच रस्त्यांवर उतरले होते. त्यामुळे सकाळपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT