police
police 
पुणे

coronavirus: पुणे पोलिसांकडून 3665 जणांना "क्‍युआर कोड" 

सकाळवृत्तसेवा

पुणे - संचारबंदीच्या काळात महत्वाच्या कामाबाबत नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी 3 हजार 665 नागरिकांना "क्‍युआर कोड दिला. ही सेवा सुरू झाल्यानंतर तीनच दिवसांत तब्बल 44 हजार 430 नागरिकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 13 हजार 484 अर्ज वेगवेगळ्या कारणामुळे नामंजूर करण्यात आले. 

नागरीकांनी डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी www.punepolice.in वर आपली माहिती कळविण्यास सांगितले होते. दरम्यान, डिजीटल पास/ डिजीटल परवानगीच्या सेवेला 27 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी 4.30 पर्यंत तब्बल 33 हजार 234 जणानी प्रतिसाद दिला. तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. 29) मार्च रोजी ही संख्या 44 हजार 430 वर पोचली. मंजूर झालेल्या अर्जांमध्ये बहुतांश अर्ज हे वैद्यकीय कारणाचे होते, तर उर्वरित अर्ज वृद्ध नागरिक व महत्वाच्या सेवा पुरविण्यासाठी काम करणाऱ्या समाज घटकाचे होते. त्यांच्या अर्जाना प्राधान्य देऊन त्यांना क्‍युआर कोड देण्यात आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांनी दिली. 

डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी इथे भरा माहिती : 
* www.punepolice.in 
* अर्ज मंजूर झाल्यास आपणास मिळेल एक क्‍यूआर कोड 
* या क्‍युआर कोडचा एक एसएमएस तुमच्या मोबाईलवर येईल. 
* पोलिसांनी अडवल्यास हा एसएमएस/क्‍युआर कोड दाखवा 

यासाठी परवानगीची गरज नाही 
पोलिसांनी परवानगी दिलेल्या घटकांसह किराणा माल, भाजीपाला, दूध यांसारख्या वस्तु आणन्यासाठी पायी जाणाऱ्या नागरीकांना परवानगीची गरज नाही. 
 
महत्त्वाच्या कामासाठीच वापरा 
डिजिटल परवानगी/ पास ही सेवा फक्त नागरीकांना त्यांच्या महत्वाच्या कामात अडथला येऊ नये यासाठी दिली आहे.जीवनावश्‍यक वस्तु आणन्यासाठी पायी जाणार्याना परवानगीची गरज नाही. नागरीकांनी महत्वाची कामे असतील तरच डिजिटल परवानगीसाठी अर्ज करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT