Pune_Police 
पुणे

'कोरोनाला अजिबात घाबरायचं नाही'; पुणे पोलिसांचा 'मनोभरोसा' देणार दिलासा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक घाबरुन जातात. तर काही रुग्ण भीतीपोटी थेट आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. अशा रुग्णांना 'त्या' परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम आता पुणे पोलिसांचा 'मनोभरोसा' हा उपक्रम करणार आहे. तेही कोरोनाशी झुंज देऊन परतलेले व विशेष प्रशिक्षित पोलिस करणार आहेत.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याचा फटका पुणे पोलिस दलाला देखील बसला. नागरीकांचे संरक्षण करताना शहर पोलिस दलातील 245 जणाना आत्तापर्यंत कोरोनाने गाठले, त्यापैकी 177 जण कोरोनामुक्त होऊन पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या पोलिस ठाण्यात रुजू झाले. 

पोलिसांनी कोरोनाशी दोन हात करत आपल्यातील लढवय्या वृत्तीचे दर्शन घडविले. याची पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी कोरोनामुक्त होतानाचा अनुभव कसा होता, त्या परिस्थितीशी त्यांनी कसा मुकाबला केला, याचा शिसवे यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कोरोनामुक्त पोलिसांच्या अनुभवाचा, इतरांना कसा फायदा होईल, असा विचार करुन त्यांनी 'मनोभरोसा' हा उपक्रम पुढे आणण्याचे निश्चित केले.

याविषयी डॉ. शिसवे म्हणाले, "शहर पोलिस दलातील 177 पोलिसांकडे कोरोनाविरुद्ध कसे लढावे, याचा अनुभव आहे. त्यापैकी कोरोनाबाधीत रुग्णाशी मोबाईल, फोनद्वारे चांगला संवाद साधु शकणाऱ्या 100 पोलिसांची आम्ही निवड करणार आहोत. कोरोनाबाधित पोलिसांचे ज्या मानसोपचारतज्ञानी समुपदेशन केले, त्याच मानसोपचारतज्ञाना या 100 पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यास सांगणार आहोत. त्यानंतर तेच कोरोनामुक्त पोलिस कोरोनाबाधित रुग्णाशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करतील."

"कोरोनामुक्त पोलिस कोरोनाबाधीतांशी दररोज संवाद साधून त्यांचे  मनोबल उंचावण्याचे काम 'मनोभरोसा' या उपक्रमाद्वारे करणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मनातील नकारात्मक विचार बाजूला जाऊन ते कोरोनाशी खंबीरपणे लढा देतील. दोन दिवसात हा उपक्रम सुरू होईल."
- डॉ. रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT