Police 
पुणे

Lockdown : पुणे पोलिसांमुळे 'ती' वेळेत पोहोचली हॉस्पिटलमध्ये; हृदयविकाराचा होत होता त्रास!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या एका विद्यार्थीनीस बुधवारी रात्री अचानक हृदयाचा त्रास होऊ लागला. तिच्या मैत्रिणींनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संचारबंदीमुळे त्यांना एकही वाहन मिळाले नाही. अखेर त्यांनी पुणे पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी पाठविलेल्या एका वाहनाद्वारे तरुणीला रुग्णालयात पोचविण्यात आले. उपचार केल्यानंतर आता तिच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होऊ लागली आहे. 

शहरातील एका नामांकीत महाविद्यालयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीना संचारबंदीमुळे त्यांच्या घरी जाता आले नाही. दरम्यान, शहरातील एका नामांकीत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन परराज्यातील विद्यार्थीनी हिंगणे खुर्द येथे वास्तव्य करीत आहेत. बुधवारी रात्री त्यापैकी एका विद्यार्थीनीस अचानक हृदयाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या दोन मैत्रीणींनी तिला रुग्णालयात नेण्यासाठी घराबाहेरील रस्त्यावर वाहनाची वाट पाहू लागल्या.

बराच वेळ वाट पाहूनही त्यांना वाहन मिळाले नाही. तर इकडे विद्यार्थीनीला आणखीनच त्रास होऊ लागला. दरम्यान, त्यांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधला. त्यानंतर याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांना संबंधित विद्यार्थीनींना मदत करण्यास सांगितले. सोनवणे यांनी तत्काळ हिंगणे खुर्द येथील खासगी वाहनाशी संपर्क साधून विद्यार्थीनीला रुग्णालयात पोचविण्याची व्यवस्था केली. तिच्यावर उपचार सुरू झाले. आता विद्यार्थीनीच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आहे. 

तुम्हाला मदत हवी आहे, तर इथे साधा संपर्क ! 
संचारबंदीमुळे अनेक परप्रातींय कामगार शहरात अडकून पडले आहेत. त्यांच्यासह अनेक मजूर, बेघर, देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बाहेरगावचे विद्यार्थी यांच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

पुणे पोलिसांनी 'सोशल पोलिसींग सेल' हा विभाग स्थापन करून त्याद्वारे संबंधितांना सर्व प्रकारची मदत पोचविली. या विभागामार्फत गरज असणाऱ्या व्यक्तींनी मदत मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या अडचणीत असाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल, तर तुम्ही सोशल पोलिसींग सेलच्या 8806806308 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू; अपघातांच्या घटना वाढल्या, २०२४ मध्ये १५ हजार ७१५ मृत्यू!

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT