Two laborers died in Govandi while cleaning drainage lane mumbai sakal
पुणे

Pune Crime : वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या तक्रारदारांमध्ये हाणामारी

यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली. पोलीस कर्मचारी आल्यानंतर रुग्णालयात शांतता झाली. या सर्व प्रकाराची शहरात मोठी चर्चा झाली.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime - वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या तक्रारदारांमध्ये हाणामारी सुरू झाल्याने आज ता.२६ रोजी रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला.

बादशहा तलाव येथील भांडणातील दोन्ही बाजूच्या बारा जणांना जुन्नर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली. पोलीस कर्मचारी आल्यानंतर रुग्णालयात शांतता झाली. या सर्व प्रकाराची शहरात मोठी चर्चा झाली.

पोलीस ठाण्यात मारामारीच्या तक्रारी घेऊन गेल्यानंतर तक्रारदारांना पत्र देऊन वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात येते. पोलीसांकडून तक्रारदारांना वाहन किंवा सोबत कर्मचारी दिला जात नाही यातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले.

बादशहा तलाव ता. जुन्नर येथे दोन कुटुंबात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी शिग, चाकू, लाठी काठी आदीने हाणामारी झाली. यात जखमी झालेल्यांनी जुन्नर पोलीस ठाणे गाठले.

येथे पोलिसांनी दोनही कुटुंबातील बारा जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे पाठविले होते. त्यांच्यात पुन्हा भांडणे होऊन व मारामाऱ्या झाल्या असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांकडून एक किलो गांजा जप्त

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT