Pune police Short film is raising the morale of Pune residents and police 
पुणे

खाकी ऑन ड्युटी : पुणे पोलिसांची शार्टफिल्म उंचावतेय पोलिस अन् पुणेकरांचे मनोबल 

सकाळवृत्तसेवा

पुणे : मृत्यु आपल्या अवतीभोवती फिरत असतो, तरीही पोलिस निधडया छातीने डॉक्टरांप्रमाणेच कोरोनाशी दोन हात करीत रस्त्यावर उभे असतात. साहजिकच त्यांच्या कुटुंबातही अस्वस्थता, भिती नाकारता येत नाही. असे असुनही "आमच्या आणि त्यांच्या दृष्टीने त्यांचे कर्तव्य महत्वाचे आहे." असा आत्मविश्वास पोलिसांचे कुटुंबीय व्यक्त करतात. अशाच पोलिसांचे, त्यांच्या कुटुंबाचे आणि पुणेकरांचे मनोबल उंचावण्याचे काम सध्या पुणे पोलिसांचा "खाकी ऑन ड्युटी" (कर्तव्य प्रथम) हा लघुपट करत आहे.

पुणेकरांचे कोरोनापासुन संरक्षण करतानाच त्यांच्यात कोरोनाविषयी जागृती करण्यासाठी पुणे पोलिसांकडुन आत्ता पर्यंत अनेक व्हिडिओ, संदेश, बोलकी छायाचित्रे प्रसारीत करण्यास प्राधान्य देण्यात आले. पुणे पोलिसांचे काही व्हिडिओ तर जगभर व्हायरल झाले. 
- स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; परिस्थिती जाणून घ्या एका क्लिकवर

दरम्यान, पुणे पोलिसांनी याच पद्धतीने "खाकी ऑन ड्युटी" (कर्तव्य प्रथम) या एका लघुपटाची निर्मिती केली. अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या या लघुपटात पोलिसांच्या कुटुंबाची अस्वस्थता, भिती व काळजी व्यक्त केली जात असल्याचे वास्तव मांडले आहे. त्याच पद्धतीने कोरोनाबाधित कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टीकोन आणि अशा काळातही एकमेकांना खंबीर साथ देत "आपण आजाराविरुद्ध लढले पाहिजे, आजारी व्यक्तिविरुद्ध नाही" असा दिलेला सामाजिक संदेश नागरीकांचे लक्ष वेधुन घेत आहे. या लघुपटाद्वारे पुणेकरांना व पोलिसांनाही कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी बळ मिळत असल्याची सद्यस्थिती आहे. विशेषत: हा लघुपट नेटकऱ्याच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा​

"माझे पती पोलिस असून ते कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात काम करतात. सर्वसामान्य कुटुंबीयांप्रमाणेच आम्हाला ही कोरोनामुळे काळजी वाटते. पण डॉक्टर, नर्स यांच्या इतकीच पोलिसांची ही समाजाला मोठी गरज आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी माझे पती व संपूर्ण पुणे पोलिस दल खंबीरपणे लढा देत आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो."
- किरण गाढवे, पोलिस कर्मऱ्याच्या पत्नी, स्वारगेट पोलिस वसाहत.

 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT