Drunk_And_Drive 
पुणे

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात 'थर्टी फस्ट'च्या रात्री मद्यपान करुन वाहने चालविणाऱ्या 132 जणांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी घातलेल्या निर्बंधामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कारवाईमध्ये घट झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. त्याचबरोबर रात्री अकरा वाजल्यानंतर जमावबंदीचा आदेश देऊन त्यानुसार पोलिसांकडून गुरुवारी रात्री शहरात कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. याबरोबरच पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही थर्टी फस्टच्या रात्री मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर थर्टी फस्टच्या रात्री अकरा वाजल्यानंतर शहरातील बहुतांश रस्त्यावर नागरीकांचे प्रमाण कमी होते. दरवर्षी नागरीकांच्या गर्दीने फुलणारे फर्ग्युसन रस्ता, महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, विमाननगर अशा ठिकाणी तरुणांचे काही मोजके समुहच जल्लोष करताना दिसत होते. तर उर्वरीत नागरीकांनी आपापल्या घरातच नववर्षाचा आनंद साजरा केला. 

दरम्यान, रात्री अकरा वाजल्यानंतर रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसत होती. जमावबंदी आदेश असल्याने रात्री अकरानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीला आळा बसला होता. नाकाबंदी वाहन तपासणी करण्यात येत होती. त्यामध्ये विना हेल्मेट, विना वाहन परवाना, विना मास्क चालकांवर कारवाई करण्यात आली. मद्यपान करुन वाहने चालविणाऱ्या 132 जणांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षी 460 जणांवर कारवाई करण्यात आली होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Politics: कराडमध्ये नगरसेवकांचे शक्तिप्रदर्शन; आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान

तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT