Pune Crime News Esakal
पुणे

Pune Crime News: धक्कादायक! पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापडले २ कोटींचे ड्रग्ज

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून ड्रग्ज जप्त केले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात खून, मारामारी, हल्ले, आम्ली पदार्थांचे सेवन असे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात ड्रग्सच्या कारवायांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसात पुणे पोलिसांनी कारवाया करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे.(Latest Marathi News)

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम चे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत. जप्त केलेल्या MD म्हणजेच मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी आहे.  (Marathi Tajya Batmya)

हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.

ललित पटेलला वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT