Pune Drugs Party Esakal
पुणे

Pune Drugs Party: ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम, स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची आयुक्तांना सूचना, मंत्री मोहोळ यांची माहिती

Pune Drugs Party: निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, अशी निलंबित पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स (X) अकाउंटवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील 'एल ३-लिक्विड लीजर लाउंज' पब बारमध्ये रविवारी (ता. २३) पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत धांगडधिंगा सुरू होता. तसेच या पबमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओ सकाळी व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले. याप्रकरणी पोलिसांनी पबचालकासह पाच जणांना अटक केली आहे. संबंधित पब, बार सील केला असून, याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण ८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या ८ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. बार मालकासह, डीजे, मॅनेजरसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ कलम लालण्यात आले आहेत.

या प्रकरणात निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये काय म्हणालेत मुरलीधर मोहोळ?

‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित…पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे.

सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणं येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT