Pune Pollution
Pune Pollution sakal
पुणे

Pune Pollution : नदीपात्रात जलपर्णीचा जाळ ; ठेकेदाराने विल्हेवाट लावण्याऐवजी दिली पेटवून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नदीपात्रातील जलपर्णी बाहेर काढून तिची वाहतूक करून शहराबाहेर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र, राजाराम पूल येथे जलपर्णी काढल्यानंतर ती वाळली तरीही वाहतूक न करता आता थेट उघड्यावर जाळून टाकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहेच, शिवाय महापालिकेलाही भुर्दंड बसत आहे.

शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा-मुठा नदी आणि तलावांमध्ये येत असल्याने तेथे जलपर्णी वाढत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे दरवर्षी मुळा-मुठा नदी, पाषाण तलाव, जांभूळवाडी तलाव आणि कात्रज तलावातील जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली जाते. ही निविदा ठराविक ठेकेदाराला मिळावी यासाठी राजकीय हस्तक्षेप केला जातो. पुरेशी स्पर्धा होऊ नये यासाठी निविदेच्या अटी व शर्ती बदलण्याचा प्रकार केला जातो. त्यामुळे या निविदा वादात सापडतात.

यंदा महापालिकेने नदीतील जलपर्णी काढण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांची निविदा काढलेली आहे. यामध्ये मशिनने जलपर्णी बाहेर काढणे, वाहतूक करण्यासह त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यानुसार वाहतूक खर्चासह ठेकेदाराचे बिल काढले जाते, पण ठेकेदाराच्या कामावर महापालिका प्रशासनाचे लक्षच नसल्याचे समोर आले आहे. खडकवासला धरणापासून वाहत येणारी जलपर्णी राजाराम पूल येथे जाळी लावून अडवली जाते. तेथे मशिन आणि मनुष्यबळाच्या साह्याने जलपर्णी नदीतून बाहेर काढली जाते. जलपर्णी वाळल्यानंतर ठेकेदाराने तिची वाहतूक करून विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे, पण ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाळलेली जलपर्णी नदीच्या कडेलाच टाकलेली आहे, ती जाळून नष्ट करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे.

प्रतिडंपर १३०० रुपये

नदी, तलावातील जलपर्णी काढल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून सूस, म्हाळुंगे परिसरात तिची विल्हेवाट लावली जाते. यासाठी महापालिकेकडून डंपरच्या प्रत्येक फेरीसाठी १३०० रुपये दिले जातात. तरीही जलपर्णी काढल्यानंतर तिची वाहतूक न करता थेट जाळून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे.

जलपर्णी जाळल्याने प्रदूषण

उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी असल्याने नागरिकांवर महापालिका दंडात्मक कारवाई करते, पण गेल्या आठवड्यापासून राजाराम पुलाखाली जलपर्णी जाळली जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या जलपर्णीमध्ये प्लॅस्टिक, कपड्यांसह इतर प्रकारचा कचराही जाळला जात असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे.

मुळा-मुठा नदीमधील जलपर्णी काढल्यानंतर संबंधित ठेकेदाराने त्याची विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेकडून वाहतूक खर्चाची दिली जाणारी रक्कम निविदेचा भाग आहे. राजाराम पूल येथे जलपर्णी वाहून न नेता, ती जाळली जात असेल, तर तपासणी करून पुढील कारवाई करू.

- दिलीप पावरा,

उपअभियंता, पर्यावरण विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT