Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Pune Porsche Accident: कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane), सनील गाडेकर

कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला १४ दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालला पोलीस कोठडीची आवश्कता नाही असं पुणे सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. गुन्हेशाखेकडून विशाल अग्रवालला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, विशाल अग्रवाल याच्या पोलीस कोठडीची आवश्कता नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

विशाल अग्रवाल याच्यावरती पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा आज नोंद करण्यात आला आहे. आज सुनावणी सुरू झाली तेव्हा पुणे पोलिसांनी युक्तीवाद केला होता की, आणखी तपास करण्यासाठी विशाल अग्रवाल आणि त्याच्या इतर साथीदारांना पोलीस कोठडी वाढवून मिळावी. पुणे पोलिसांनी याबाबत आपली बाजू लावून धरली होती. मात्र, कोर्टाने स्पष्टपणे या प्रकरणात आता पोलीस कोठडीची आवश्कता नाही असं सांगितलं आहे. यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आरोपींच्या वकिलांनी जामीनसाठी अर्ज केला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (ता. २४) त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पुणे पोलिसांनी युक्तीवाद करताना सांगितले होते की, सीसीटीव्ही आणि विशाल अग्रवाल यानी केलेली फसवणूक यांचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी. तर दुसरीकडे अग्रवाल याच्या वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, पोलिसांनी तपासासाठी इतका वेळ का लागतो आहे.

मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली असल्याचे चालकाने त्याच्या जबाब सांगितले असल्याची माहिती बुधवारी (ता. २२) पोलिसांनी न्यायालयास दिली होती. ब्लॅकमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचेही पोलिस तपासातून पुढे आले आहे. बेदरकारपणे कार चालविणाऱ्या मुलासह इतर अल्पवयीन मुलांना पबमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही पब मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अग्रवाल यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे सायबर तज्ञांच्यासमोर विश्लेषण करायचे आहे. त्यामुळे अग्रवाल यांच्या पोलिस कोठडीत वाढ करणे गरजेचे आहे. तपासातून समोर आलेल्या मुद्द्यांचा सखोल तपास करण्यासाठी इतर आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.

आरोपींच्यावतीने ॲड. एस. के. जैन, ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे, ॲड. अमेय गोऱ्हे आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. आता न्यायालयाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ते जामीनासाठी अर्ज करू शकतात.

विशाल अग्रवाल याच्यासह इतर आरोपींना देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विशाल अग्रवाल पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूकसह विविध कलमनुसार कलमवाढ

या गुन्ह्यातील आरोपींवर फसवणूकसह विविध कलमानुसार कलमवाढ करण्यात आली आहे. अपघात झालेल्या मोटारीची नोंदणी न करता शासनाचा महसूल बुडून फसवणूक केली. तसेच मोटार वाहन कायद्याच्या काही कलमांचा सहभाग यात करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार देखील आता कारवाई करण्यात आली आहे.

47 हजार रुपयांचे बिल

दुचाकीला धडक देण्यापूर्वी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी कोझी आणि ब्लॅक पबमध्ये मद्यपान केले होते, असे पोलिसांच्या तपासून समोर आले. त्या पबमध्ये मुलाने 47 हजार रुपयांचे बिल भरले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

काय आहे संपुर्ण प्रकरण?

हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शेने चिरडले, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला.

न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अल्पवयीन सुधारगृहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT