पुणे

Ravindra Dhangekar: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी पैसे खाल्ले, धंगेकरांचा आरोप! आयुक्तालयासमोर बसले आंदोलनाला

Ravindra Dhangekar: पुण्यात भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. ही कार 17 वर्षीय अल्पवयीन तरुण चालवत होता, जो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. न्यायालयाने त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती आणि त्याची सुटका केली होती. नंतर वाद वाढत गेल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करून त्यांची रवानगी निरीक्षण गृहात केली.

Sandip Kapde

Ravindra Dhangekar:

पुणे पोर्शे अपघात प्रकरणाला नवीन वळ मिळत आहेत. काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर पोलीस आयुक्तलयासमोर आंदोलनाला बसले आहेत. या अपघात प्रकरणात पोलीसांनी पैसे खाल्ल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली. Pune Porsche Accident

आमदार झाल्यानंतर मी सातत्याने अमली पदार्थ, पब संस्कृती पुण्यातून हद्दपार करा, अशी मागणी मी केली. हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे. दोन दिवसांपूर्वी दोन अभियंत्यांची पुण्यात हत्या झाली. ज्या प्रकारे पुणे पोलिसांनी याचा तपास केला. या तपासात अनेक त्रुटी ठेवल्या. दोन एफआयर बनवण्यात आले. पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांना इथं यावं लागलं. त्यांनी पुणेकरांची समजूत काढण्यासाठी दुसरी एफआयर दाखल केली. मात्र तपास अधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल केला पाहीजे. गुन्हा दाखल केला नाही तर मी रोज पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार, असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला.

या अपघात प्रकरणात करोडो रुपयांचा व्यवहार एका रात्रीत झाला. एक बिल्डरचा पोरगा पोलीस स्टेशनमध्ये पिझा पार्टी करतो आणि लाल कारपेट टाकून तो घरी देखील जातो. त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जी मुले मृत्यूमुखी पडले त्यांच्या पंचनाम्यासाठी देखील पोलीस आले नव्हते. त्याआधी आरोपी घरी होते, असे धंगेकर म्हणाले.

रवींद्र धंगेकर म्हणाले, पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आपला मुलगा पुण्यात शिकायला गेला तर सुरक्षित आहे का?, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. विद्येच्या माहेरघराला तडा लावण्याचे काम पाकिट संस्कृती आणि पोलिसांच्या माध्यमातून होत आहे.

पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात पैसे पोहचतात. पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही. पोलीस खात्यावर पैशाच्या पाकिटाचं वजन आहे. कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता. कुठल्या हॉटेलमध्ये डील झाली, कुणाला फोन केले, या सर्व गोष्टींचा तपास झाला पाहीजे, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba Ghat Accident : आंबा घाटात भीषण अपघात; परराज्यातील बस ७० फूट दरीत कोसळली

Marathi Breaking News LIVE: नाशिकमध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरणी उपसंचालकावर पोलिस कोठडी; फरार आरोपी अजूनही शोधात

Courtroom Drama: सुनावणी सुरू झाली अन् वकील तोंडावर टेप लावून आले; न्यायालयात घडला विश्वासघाताचा प्रसंग, न्यायाधीशही संतापले

Shukra Guru Pratiyuti Yog 2026: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तयार होतोय शक्तिशाली राजयोग, 'या' राशींना होईल आर्थिक लाभ

माेठी बातमी ! ‘सुरत-चेन्नई’तील २२२ किमी मार्ग बीओटीवर होणार; भारतमाला योजनेची मुदत संपल्याने निर्णय..

SCROLL FOR NEXT