Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident : पोलिसांमध्येच नव्हता ताळमेळ, घटनास्थळी जाऊनही....; निष्काळजीपणा भोवणार? २ पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे रोजी एका 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या पोर्श कारने चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला होता. आरोपी कार चालक हा रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात पोलिसांचा सर्वात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर येरवडा पोलिस स्टेशनचे दोन अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र त्यांनी याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. यावेळी झोन-१ चे डीसीपी गिल हेही नाईट राउंडवर होते, असे बोलले जात आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती न दिल्याने त्यांना या अपघाताची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबतचे वृत्त आज तक ने दिले आहे.

पत्रकार परिषदेत पुणे एसपींनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या दाव्यावरती स्पष्टपणे सांगितले होते की, अल्पवयीन आरोपीने घराबाहेर कार नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. यासोबतच घटनेनंतर कोठडीत असताना अल्पवयीन मुलाला पिझ्झा आणि बर्गर खायला दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे.

घटनेच्या वेळी अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवत नव्हती, असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या जागी दुसरा कोणीतरी गाडी चालवत होता. ड्रायव्हरवरील पुरावे नष्ट करण्यासाठी आम्ही एफआयआरमध्ये कलम 201 जोडणार आहोत. ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य दिले आहे का, याचीही माहिती घेऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या फॅमिली ड्रायव्हरला फोन करून पोलिसांकडे जाण्यास सांगितले होते. चालकाला पोलिसात जाऊन घटनेची जबाबदारी घेण्यास सांगण्यात आले. त्याबदल्यात त्याला रोख रक्कम दिली जाईल. या कारणास्तव, ड्रायव्हरने त्याच्या पहिल्या जबाबात सांगितले की, तो कार चालवत होता. शुक्रवारी पोलिसांनी विशाल अग्रवालविरुद्ध पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली कलम २०१ जोडले आहे.

अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यात विशेष वागणूक दिली गेली नाही. येरवडा पोलिसांचा काही निष्काळजीपणा असेल तर त्यांच्यावर कारवाई करू.

काय आहे संपुर्ण प्रकरण?

हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शेने चिरडले, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला.

न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अल्पवयीन सुधारगृहात आहे.

अल्पवयीन व्यक्तीवर प्रौढ म्हणून कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, अल्पवयीन आरोपींवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवावा. यासाठी पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. आरोपी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केल्याच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांचे हे वक्तव्य आले आहे.

ते म्हणाले की, आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 304, 304A आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT