Vishal Aggarwal 45 missed calls to MLA Sunil Tingre  esakal
पुणे

Pune Porsche Crash: 'त्या' अपघाताच्या रात्री विशाल अग्रवालचे आमदार टिंगरेंना 45 मिस्ड कॉल; आतली गोष्ट बाहेर

Pune Porsche Crash: आमदार सुनील टिंगरे आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संबंध केवळ समोर आलेले नाहीत, तर ससून हॉस्पिटलचे डॉ. अजय तावरे यांच्याशीही त्यांचे संबंध जोडलेले आहेत

Sandip Kapde

Pune Porsche Crash:

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहे. निकाल दाबण्यासाठी पैसा आणि राजकीय शक्तीचा मोठा वापर झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात आधीपासून अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव आधिपासून येत आहे. अपघात झाल्या त्या दिवशी टिंगले पोलीस स्टेशमध्ये गेल्याचे देखील स्पष्ट झाले होती. दरम्यान नवीन माहिती समोर आली आहे. 19 मेच्या रात्री विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालने आमदार सुनील टिंगरे यांना 45 मिस्ड कॉल केले.

स्थानिक आमदार सुनील टिंगरे आणि अग्रवाल यांच्यातील संबंध केवळ समोर आलेले नाहीत, तर ते ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांच्याशीही त्यांचे संबंध समोर आले आहेत. तावरेंना अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

20 मे रोजी झालेल्या अपघाताच्या एका दिवसानंतर त्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, टिंगरे सकाळी 6 वाजेपर्यंत येरवडा पोलिस ठाण्यात हजर असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. त्यांनी मात्र पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप फेटाळले आहे. पण आता त्यांच्या पक्षानेही त्यांना या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

पोलिसांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार आमदार सुनिल टिंगरे यांना 19 मे रोजी रात्री 2.30 ते पहाटे 3.45 च्या दरम्यान विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल आले, परंतु ते झोपेत असल्याने कॉल उचलता आले नाहीत.

सुनील टिंगेरे यांनी डॉक्टर अजय तावरे यांची पार्श्वभूमी माहित असून देखील ससुनमध्ये उच्च पदासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस केली होती. त्याचे पत्र देखील समोर आले आहे. दरम्यान पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT