पुणे

Pune Porsche Accident: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

अजित पवार यांनी अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले| Ajit Pawar denied all allegations that there was an attempt to suppress the accident case

सकाळ वृत्तसेवा

Pune News: कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलिस योग्य प्रकारे कारवाई करत आहेत. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यात शनिवारी सकाळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांनी अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. पवार म्हणाले, विरोधक काय आरोप करीत आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. पण ही घटना घडल्यापासून चौकशीत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होत आहे.

अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री म्हणून मी चौकशीचे आदेश दिले. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली या प्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला. सुरुवातीच्या काळात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. हा जामीन न्यायालयाने दिला होता, त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले तेव्हा अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमं लावण्यात आली. चौकशीत दोन पोलिस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे समोर आले. त्यांच्यावर‌ निलंबनाची कारवाई झाली. ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी सुरु आहे. अपघात घडला तेव्हा मंत्री हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही आपल्या खात्याला सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे.

टिंगरे यांनी दबाव आणला नाही

अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी कोणावरही दबाव आणला नाही. मतदारसंघात एखादी घटना घडल्यास आमदार त्या ठिकाणी जातात, असे सांगत अजित पवार यांनी टिंगरे यांची पाठराखण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT