Covid Hospital Covid Hospital
पुणे

पुणे : तिसऱ्या लाटेची तयारी, जम्बोला मान्यता

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

ब्रीजमोहन पाटील

पुणे : कोरोच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला असताना शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो रुग्णालयास तीन महिने मुदतवाढ देण्याचा आली आहे. स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिकेने उभारलेल्या जम्बो रुग्णालयात ६०० ऑक्सिजन बेड, १०० आयसीयू बेड व २०० एचडीयू बेड आहेत. दुसऱ्या लाटेत हे रुग्णालय पुणेकरांसह शहराबाहेरील नागरिकांसाठी वरदान ठरले होते.

या रुग्णालयाची मुदत ३० जून रोजी संपली होती, त्यानंतर पुढे नऊ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. तसेच हे रुग्णालय पुढे सुरू ठेवायचे असल्यास त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले असता, जानेवारी २०२२ पर्यंत त्याचा वापर करता येऊ शकतो असा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आणखी चार महिने महापालिकेकडे आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली असल्याने आयुक्तांनी नुकतीच प्रशासनाची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला, त्यामध्ये जम्बो सुरू करण्याची तयारी ठेवा असेही सांगितले होते. त्यानंतर आज स्थायी समितीमध्ये तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. जम्बोमधील सेवा, वैद्यकीय उपचार देण्याचे काम पूर्वीच्याच खासगी संस्थांकडे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

SRH vs KKR: सुनील नरेनचे इतिहास घडवला, 'असा' पराक्रम करणारा पहिलाच ठरला! हैदराबादचा संघ कोलकातासमोर १७० च्या आत ऑलआऊट

"तिने मला ओळखच दाखवली नाही" अश्विनी भावेंवर महेश टिळेकरांनी व्यक्त केली नाराजी "मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो"

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

SCROLL FOR NEXT