पुरंदर किल्ला सर sakal
पुणे

पुणे : सायकलवरून २०० वेळा पुरंदर किल्ला सर

पुरंदर सायकल क्लबचे सायकलपटू शंतनू निगडे यांच्याकडून कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

गराडे : पुरंदर सायकल क्लबचे सायकलपटू शंतनू महादेव निगडे यांनी एका वर्षात पुरंदर किल्ला तब्बल २०० वेळा सायकलवरून चढण्याची कामगिरी केली आहे. या वेळी किल्ल्याच्या गेटजवळ राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश खाटपे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड व तालुकाध्यक्ष तन्मय यादव यांच्या हस्ते करण्यात आला.

२०२० मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असताना शरीर तंदुरुस्त राहत नाही याची जाणीव झाल्याने कोडित ते पुरंदर असे सायकलिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुरंदर सायकल क्लबचे संतोष झेंडे यांची ओळख झाली. यातून पुरंदर किल्ला चढण्यास सुरुवात केली. यातून पुरंदरच्या इतिहासाचे पैलू उलगडत गेले. या ठिकाणी जैवविविधता चांगली असल्याने वारंवार येथे येण्याचा उत्साह वाढत गेला. यातूनच २०० वेळा सायकलवर किल्ला सर करता आल्याचे शंतनू निगडे यांनी सांगितले.

या वेळी मावळ ॲथलेटिक असोसिएशनचे सुभाष वाजे, योगेश चौधरी, पुरंदर सायकल क्लबचे संतोष झेंडे, दीपक जांभळे, गणेश चाळेकर, केतन जगताप, मनोज मेमाणे, प्रवीण बोरावके, सिद्धू पाटील, बाबूराव भुसारी, सागर उबाळे, अमित बाटे हे सायकलपटू आदी

उपस्थित होते.

पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. परंतु हा किल्ला सध्या मिलिटरीच्या ताब्यात आहे. भविष्यात या सायकलपटूंनी मोठमोठे विक्रम करावे अशा शुभेच्छा राष्ट्रवादीचे काँग्रेस भटक्या विमुक्त जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT