Flood
Flood 
पुणे

Pune Rains : मालकाला भेटण्यासाठी कुत्र्याने मारली पुरात उडी

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर  - कालच्या ढगफुटीमुळे शिवगंगा खोऱ्यात पाण्याने प्रचंड हाहाकार माजवला. प्रचंड नुकसान झाले. काहींचे प्राण गेले, तर अनेकांनी रात्र पाण्यात काढली. अशाच एका पाण्याने वेढलेल्या घरातील मालकाला वाचवण्यासाठी त्याच्या ईमानी कुत्र्याने थेट पुराच्या पाण्यात स्वतःला झोकून दिले. मात्र, तो वाहून गेल्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मन हेलावले.

शिवापूर येथील रमेश रेडेकर यांनी हा प्रसंग सांगितला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास पाऊस पडत होता. त्याचवेळी त्यांना कोंढणपूर रस्त्यालगत राहणारे त्यांचे मित्र अजय मजुमले यांचा फोन आला. त्यांनी घराच्या खिडकीला ओढ्याचे पाणी लागल्याचे सांगितले. त्यांना मदत करण्यासाठी रेडेकर यांनी घरातून मोठी दोरी, बॅटरी व फावडे व चार पाच मित्रांना बरोबर घेऊन मुजुमले यांचे घर गाठले. त्यांच्या घराला पाण्याने पूर्ण वेढा दिला होता. पाण्याला प्रचंड गती होती. 

मुजमुले यांचा कुत्रा घराबाहेरच रस्त्यावर अडकला होता. या दरम्यान, कोंढणपूर रस्ता २५ ते ३० फूट अचानक खचला व सुमारे २० फूट खोल वाहून गेला. त्यामुळे सर्वच लोकांना बाजूला हटवले व रस्त्यावरील वाहतूक थांबवली. मुजुमले यांना वाचवण्यासाठी दोरी टाकून पाण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न रेडेकर करत होते. 

दरम्यान, रस्त्यावरील वाहतूक हळूहळू सुरू होऊ लागल्यावर रेडेकर व अन्य यांनी अजय मुजुमले यांना आवाज दिला. ते उंच ठिकाणी बसले होते. तेथून बाहेर आले. त्यांनीही रेडेकर यांना आवाज देऊन घरातील सर्वजण व्यवस्थित असल्याचे सांगितले. हा अजय मुजुमलेंचा आवाज जसा कुत्र्याच्या कानावर पडला, तसा कुत्रा अजून बेचैन झाला. त्याने मालकाकडे जाण्यासाठी सरळ वाहत्या पाण्यात उडी मारली. परंतु दुर्दैवाने पाण्याच्या वेगापुढे त्याचा निभाव लागला नाही. सर्वांसमक्ष मालकाचे ईमानी कुत्रे मालकाच्या प्रेमाखातर वाहून गेले. हा प्रसंग पाहून सर्वांचेच मन हेलावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT