Rain Update (file photo) Sakal Pune
पुणे

Pune Rain : मॉन्सून दाखल होऊन एक महिना उलटला; मात्र अजूनही प्रगती पुस्तक कोरेच, तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची तूट

जून महिन्याच्या २४ तारखेला पुण्यासह राज्यभरात मॉन्सून दाखल झाला अन् अल्पावधीतच जोरदार पावसाला सुरवात झाली.

सम्राट कदम

पुणे - पुण्यात मॉन्सून दाखल होऊन सोमवारी (ता.२४) बरोबर एक महिना होत आहे. मात्र, अजूनही मॉन्सूनचे प्रगती पुस्तक कोरेच असून, तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची तूट आहे. रोजच ढगाळ वातावरण, रिमझीम पाऊस आणि चिखलाच्या चिडचिडीमुळे पुणेकर आता हैराण झाले आहे. त्यामुळे एकदाचा जोरदार पाऊस पडून नदी दूथडी भरून वाहवी, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहे.

जून महिन्याच्या २४ तारखेला पुण्यासह राज्यभरात मॉन्सून दाखल झाला अन् अल्पावधीतच जोरदार पावसाला सुरवात झाली. पुण्यात पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार ‘बॅटींग’ केली, अगदी जुलैच्या पहिल्या दिवसापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

म्हणजे एक जुलैला पडलेला २०.४ मिलिमीटरचा पाऊस ही यंदाच्या मोसमातील आजवरची सर्वोच्च नोंद! त्यानंतर मात्र, शहरात एकदाही मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली नाही. रविवार पर्यंत शहरात सरासरी २७६.६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत होते.

मात्र, फक्त १७०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अजूनही १०५.८ मिलिमीटर पावसाची तूट कायम आहे. बंगालच्या उपसागरात सोमवार (ता.२४) पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार होणे अपेक्षीत आहे. तसे झाल्यास पुन्हा एकदा शहरात पावसाचा जोर वाढले अन् जोरदार पावसाची पुणेकरांची प्रतिक्षा संपेल, असा आशावाद आहे.

पुण्यातील पावसाचे प्रगतीपुस्तक -

- आजवर एकदाही २४ तासात २१ मिलिमीटर पावसाची नोंद नाही

- महिन्यातील फक्त सहा दिवसच १० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला

- महिन्यातील फक्त दोन दिवस शुन्य मिलिमीटर पाऊस

- सर्वाधिक पाऊस १ जुलै रोजी (२०.४ मिलिमीटर)

- शहराच्या पश्चिमेच्या भागात विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये तुलनेने अधिक पाऊस

जुलै महिन्यातील सर्वाधिक पर्जन्यमान -

वर्ष : तारीख : पाऊस (मिलिमीटर)

२०१९ ः २७ ः ७८

२०२० ः २६ ः ३६.८

२०२१ ः २४ ः ८०

२०२२ ः १४ ः ५३

२०२३ (ता.२४ पर्यंत) ः १ ः २०.४

पुणे शहरातील पर्जन्यमान (मिलिमीटर)

- जून महिना ः

दिवस ः पाऊस

२५ ः १४.२

२६ ः १०.८

२७ ः ६.५

२८ ः १४.४

२९ ः १०.३

३० ः ५.९

- जुलै महिना ः

१ ः २०.४

२ ः १.९

३ ः ७.९

१९ ः ६.४

२० ः १७.४

२१ ः १.३

२२ ः ७.४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT