Pune Unseasonal Rain 
पुणे

Pune Unseasonal Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात... पुणेकरांची तारांबळ, अनेक भागात बत्तीगुल

Sandip Kapde

Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सिंहगड रस्ता परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच कोथरूड परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे.

संध्याकाळी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांती तारांबळ उडाली. शहरातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात वीज गायब झाली आहे. खराडी मुंढवा, वाघोलीत पण पावसाला सुरूवात झाली आहे. IMD ने आज महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला होता.

आज (26 नोव्हेंबर) आणि उद्या (27 नोव्हेंबर 2023) महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळासोबत गारपीटही होऊ शकते.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे वैगई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (Pune Rain Update)

आज नाशिक परिसरता देखील जोरदार पाऊस आला. यामुळे जिल्ह्यातील निफाडच्या द्राक्ष पंढरीत रविवारी अवकाळी पावसाने गारांसह अतिशय जोरदार फटका दिल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT