Rape Crime news
Rape Crime news Sakal
पुणे

पुणे: परदेशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

पुणे: रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने परदेशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी रिक्षा चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना हडपसरमधील रेसकोर्स परिसरातील आहे. तिच्याकडे पैसे नसल्याने तिच्यावर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. याबाबत आता रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

काय घडलं नेमकं?

या मुलीजवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेत या रिक्षाचालकाने या मुलीला रेसकोर्स जवळील एका झाडीत नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकासह इतर तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी सागर बिभीषण बचुटे (वय 24), विकी कुमार फुलो पासवान (वय 23) आणि अशोक विर बहादुर थापा (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि 5 जानेवारी 2019 रोजी हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी आणि त्याची मैत्रीण सागर बचुटे याच्या रिक्षाने बुधवार पेठ येथे जात होत्या. यावेळी फिर्यादी आणि त्यांचा मैत्रिणीकडे पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन या आरोपीने रेसकोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तर डिसेंबर 2019 च्या दुसऱ्या आठवड्यात फिर्यादी या फुरसुंगी परिसरात राहत असताना त्यांच्या ओळखीचे असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून त्यांची छेड काढली. दरम्यान तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT