Rape Sakal
पुणे

पुणे बलात्कार प्रकरण: शाळेचा वॉचमन निघाला नराधम; पोलिसांकडून अटक

सकाळ डिजिटल टीम

पुणे: पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने शहरात खळबळ पसरली आहे. शहरातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने १३ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. अखेर त्याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

अत्याचार करणारा नराधम हा 32 वर्षीय शाळेचा वॉचमन असल्याचं समजतंय. हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र असल्याचंही समजत आहे. त्याचं नाव मंग्या असून जनवाडीतील दारू गुत्यावरून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पीडीत मुलगी जिथे राहत होती तिथेच हा आरोपी राहायला होता. पोलिसांकडून संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने पीडित विद्यार्थिनीला ढकलत एका नामांकित शाळेतील बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकारानंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या कानावर ही घटना घातली. मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. त्यानंतर या आरोपीच रेखा चित्र तयार करण्यात आलं होतं. अखेरिस या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

घडलेली घटना अशी, पुण्यातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने ११ वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना बुधवारी घडली आहे. पीडित मुलीला ओळख असल्याचा बहाणा करून ढकलत शाळेतील बाथरूम नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी संबंधित नराधमावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात महिला अत्याचारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. या घटनेसंदर्भात नागरिक संताप व्यक्त करत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT