Pune Rave Party Hearing ESakal
पुणे

Pune Rave Party: पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! कोर्टाचा मोठा निर्णय, आरोपींची रवानगी कोठडीत, पण किती दिवसांसाठी?

Pune Rave Party Accused Hearing: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेत पुणे कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सातही आरोपींची रवानगी कोठडीत केली आहे.

Vrushal Karmarkar

पुण्यातील खराडीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आज पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास सुमारास स्टेबर्ड, अझुर सुट याठिकाणी गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७ जणांकडून कोकेन सदृश पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यात एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेलवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अन्य ६ जणांना ताब्यात घेतले आहे. यानंतर दुपारी ३.३० वाजता या सर्वांना कोर्टात हजर करण्यात आले. यानंतर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रांजल मनिष खेवलकर (४१), निखिल जेठानंद पोपटाणी (३५), समीर फकीर महमंद सय्यद, वय (४१) सचिन सोनाजी भोंबे (४२), श्रीपाद मोहन यादव (२७) ईशा देवज्योत सिंग (२२), प्राची गोपाल शर्मा (२३) या सात जणांना अटक करण्यात आले होते. आरोपींकडून ४१ लाख रुपये ज्यामध्ये २.७० ग्रॉम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॉम गांजा सदृश पदार्थ जप्त करण्यात आला.

तसेत आरोपींकडून १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट व दारू व वियरच्या बॉटल, हुक्का फ्लेवर जप्त केले आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (11) अ, २१ (ब),२७ कोटपा ७ (२), २०(२), प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर या प्रकरणाची सुनावणी कोर्टात झाली. यातील आरोपींना पुणे कोर्टात हजर करण्यात आले. पुणे कोर्टाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींना पुणे कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणातील आरोपींना पुणे कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रांजल मनिष खेवलकरांनाही पोलीस सुनावण्यात आली आहे. आरोपींना दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. २९ जुलैपर्यंत आरोपी पोलीस कोठडीत राहणार आहेत. कोर्टाच्या सुनावणीनंतर आरोपींच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना आरोपींचे वकील म्हणाले की, हा पूर्णपणे बनाव आहे. रेव्ह पार्टी म्हणजे बालिशपणा वाटतो. एका फ्लॅट मध्ये ४ जणं एकत्र येतात त्याला रेव्ह पार्टी म्हणता येणार नाही. २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कुठल्या पदार्थाचे सेवन खेवलकर यांनी केलं नाही. ब्लड सँपल आल्यावर सिद्ध होईल की त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केलं नव्हतं. खेवलकर ज्या हॉटेल मध्ये होते तिथे रेकी करण्यात आली होती. २ वेळा त्यांच्या विरोधात ट्रॅप रचला गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

AI क्रांतीचा फटका! कामगिरी नव्हे, कौशल्य हवे! TCS ने बदलली खेळी, 12 हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात

Mumbai Local Megablock: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’; सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडले महागात

GST On UPI: २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी आकारला जाणार का? सरकारनं स्पष्टच सांगितलं!

SCROLL FOR NEXT