Pune-Lockdown.jpg 
पुणे

पुणेकरांना मिळणार लॉकडाउन चारमध्ये दिलासा? 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे लॉकडाउन चारबाबत लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना करताना पुण्यात काय सुरू होणार, काय बंद होणार, कंटेन्मेंट झोन कसे असणार, याबाबत पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

संपूर्ण जगभरात कोरोना हाहाकार घालत असताना पुण्यामध्येही कोरोनाने सर्वत्र हातपाय पसरले आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा शेकड्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत पाचशेपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे लॉकडाउन चारमध्ये पुणेकरांना दिलासा देण्याबाबत प्रशासन उत्सुक नाही. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही तसेच संकेत दिलेले आहेत. पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असल्यामुळे नुकत्याच घोषित केलेल्या लॉकडाउन चारमध्ये त्याच अटी शर्ती राहतील. त्यात फारसा बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पुण्यातील काही भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना काही ठिकाणी कोरोना नियंत्रित आहे. औंध, कोथरूड परिसरात पेठांच्या तुलनेत दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, कंटेन्मेंट झोन कशा पद्धतीने असणार, याचीही उत्सुकता आहे. 

मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून घरात बसून आहेत. ते काहीतरी दिलासा मिळेल, याच्या प्रतीक्षेत आहेत. विद्येचे माहेरघर ही पुण्याची ओळख आहे. त्यामुळे शाळा व कॉलेज सुरू करण्याबाबत, तसेच स्टेशनरी व कपड्यांची दुकाने पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे. खवय्ये असलेल्या पुणेकर गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलचे पायरी चढलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलबाबत काही तरी दिलासा निश्‍चित मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी- क्लिक करा

पुणेकर कंटेन्मेंट झोन वगळता उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे जिल्ह्यात ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्‍यकता असलेल्या परिसरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT