Traffic congestion esakal
पुणे

Pune Traffic : धनकवडी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार ? वाहतूक विभागाचा पाहणी दौरा

त्या संदर्भात १२ मीटर लांबीच्या वरील रस्त्यांविषयी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील पथ विभाग यांच्या सहकार्याने या रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमणे..

सकाळ डिजिटल टीम

Pune Traffic - धनकवडी परिसरातील भारतीय विद्यापीठ भागाच्या मागील बाजूकडे आंबेगाव पठार कडे जाणाऱ्या रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

या संदर्भात शुक्रवारी संध्याकाळी धनकवडी-सहकारनगर कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे व भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी त्रिमूर्ती चौकातील वाहतूक समस्या सोडवण्याकरिता पाहणी दौरा आयोजित केला.

यावेळी शाखा अभियंता व्यंकटेश इंद्राक्षे ,कनिष्ठ अभियंता चंद्रकांत राऊत ,सुवर्णा शिंदे, प्रशांत परदेशी, आशिष जमदाडे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

त्रिमूर्ती चौक ते चंद्रभागानगर रस्ता या भागातील रस्त्याच्या बाजूकडील अतिक्रमण, साईड पट्टे, पार्किंग बोर्ड, व दुकानांच्या समोरील अनधिकृत पार्किंग, रस्त्याच्या बाजूने फुटपाथ, सम विषम दिवस पार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, यासंदर्भात चर्चा होऊन पाहणी करण्यात आली.यावेळी सहाय्यक आयुक्त भनगे म्हणाल्या, अनेक वर्षापासून येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत तांत्रिकबाबीचा विचार करून लवकर सोडवण्यात येईल.

त्या संदर्भात १२ मीटर लांबीच्या वरील रस्त्यांविषयी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील पथ विभाग यांच्या सहकार्याने या रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमणे, फुटपात, साईड पट्ट्या, याविषयी बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेण्यात येऊन लवकरात लवकर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलण्यात येईल.धनकवडी कडून भारती विद्यापीठाकडे जाण्याकरता व पुढे दत्तनगर चौक कडे जाण्यासाठी या मुख्य त्रिमूर्ती चौकातून जावे लागते.

तसेच भारती विद्यापीठ मागील परिसरात अनेक विद्यार्थी राहत असल्याने रस्त्यावर चालणाऱ्याची संख्या अधिक असते. तसेच वाहनाची संख्याही खूप असते, त्यात अरुंद रस्ता व रस्त्याच्या बाजूने असणारी दुकाने आणि दुकानामध्ये जाणारी ग्राहक त्यांच्या वाहने थेट रस्त्यावर लावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. काही जण सार्वजनिक जागेवर स्टॉल उभे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT