पुणे : कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या उद्देशाने उभारलेला मात्र, गेल्या दहा वर्षात एक युनिटही वीज तयार न झालेल्या हडपसरमधील रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पाला रविवारी पुन्हा आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही. याआधी दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.
कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी रामटेकडी परिसरात 2010 मध्ये रोकेम प्रकल्प उभारला आहे. खासगीकरणातून उभारलेल्या या प्रकल्पाची रोजची क्षमता सातशे टन असून, गेल्या दहा वर्षात त्यात रोज जेमतेम 250 ते 300 टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकली. त्यातून एक युनिटही विजेची निर्मिती झालेली नाही. प्रकल्पाच्या आवारात कचरा टाकण्यास विरोध करीत नगरसेवक योगेश ससाणे यांनी कचऱ्याच्या गाड्या रोखल्या होत्या. या प्रकल्पाला लागणाऱ्या आगीच्या घटनांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
उभारणीपासून वादात सापडलेल्या रोकेम कचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराला नोटीस बजावून तो बंद का करू नये, याची विचारणा महापालिकेने ठेकेदाराकडे केली होती. त्यानंतर लगेचच तांत्रिक बिघाड दाखवून ठेकेदाराने देखभालीसाठी प्रकल्प बंद केला होता. त्याच कालावधीत म्हणजे, दीड वर्षापूर्वी प्रकल्पाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर तो सुरू करण्यात आला. तेही केवळ अडीचशे टन क्षमतेनेच. त्यानंतरही प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ होण्याची शक्यता नसल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांनी 15 सप्टेंबरला करार रद्द केला होता. तशी नोटीसही ठेकेदाराला दिली आहे. त्यात आता पुन्हा आग लागल्याने आगीच्या घटनांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
प्रकल्पाची उभारणी
2010 मध्ये
प्रकल्पाची क्षमता
700 टन कचऱ्यावर प्रक्रिया (रोज)
प्रत्यक्ष प्रक्रिया
250 टन (रोज)
महापालिकेचा खर्च
प्रत्येक टनामागे 300 रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.