Deputy Commissioner of Police Sandeep Singh Gill
Deputy Commissioner of Police Sandeep Singh Gill sakal
पुणे

Sandeep Singh Gill : विशेष मुलांचा सर्व स्तरामध्ये सन्मान झाला पाहिजे

मोहिनी मोहिते

विशेष मुलांचा सन्मान समाजातील सर्व स्तरात झाला पाहिजे. त्यांच्यातील चांगले गुण पाहून त्यांना प्रोत्साहन दिले, तर समाजामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.

कॅन्टोन्मेंट - विशेष मुलांचा सन्मान समाजातील सर्व स्तरात झाला पाहिजे. त्यांच्यातील चांगले गुण पाहून त्यांना प्रोत्साहन दिले, तर समाजामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. विशेष मुलांना आपलेपणाची वागणूक दिली, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल, असे सष्ट मत पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी व्यक्त केले.

मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, सेंट मार्गरेट स्कूल, संतुलन, अयोद्धा चॅरिटेबल ट्रस्ट, इमॅन्युअल पब्लिक स्कूल, झेप रेमेडियल लर्निंग सेंटर, ब्लाइंड (अद्वित परिवार) इंटरनॅशनल क्रिकेट पुणे, जॉय कीड्स क्लब, सावली, अंजुमन गर्ल्स स्कूल ऑरफंग या एनजीओमधील ५०० विशेष मुलांनी बंडगार्डन येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचा आनंद लुटला.

याप्रसंगी झोन-१चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, जि.प.च्या माजी सदस्या अंकिता पाटील-ठाकरे, अभिनेता राहुल जगताप, डॉ. त्रिशला राणे, समृद्धी मोहल, प्रकाश शेळके, काश्मिर नागपाल, अरुण चोप्रा, वीरमीतसिंग मनी, अशोक अग्रवाल, सुभाष कोहली, परमेश दरगन, यशवंत नडगम, संजीव शर्मा, राजू यादव, अरविंद बुधानी, भोलासिंग अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

मनजितसिंग विरदी म्हणाले की, विशेष मुलांबरोबर चित्रपट पाहत असताना त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. अभिनेता-अभिनेत्रीसारखे नृत गाणी म्हणण्याची त्यांची हौस पूर्ण होताना समाधान वाटते. त्यांच्या आवडीचे चित्रपट दाखवत, त्यांना आवडता मेनू देण्यात विशेष आनंद वाटला. विशेष मुलांना मुलांना जे आवडते ते करण्याची संधी देत त्यांना सकारात्मक जीवन जगता यावे, यासाठी हा प्रपंच राबवित आहे. विशेष मुलांना त्यांच्या आवडीचा मेनू आणि चित्रपट पाहण्यासाठीचा उपक्रम मागिल २४ वर्षांपासून राबवित आहे.

विशेष मुलांबरोबर २४ बाय ७ त्यांच्या सेवेत असणाऱ्या केअरटेकर्स चित्रपट पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही. त्यांच्यासह त्यांचे केअरटेकर यांच्यासाठी फक्त चित्रपट पाहिला नाही, तर त्यांच्या आवडीचे स्नॅक्स, चॉकलेट्स, सँडविचचा आस्वाद घेतला. चित्रपट पाहत असताना मुलांनी नृत्य करीत गाणे गायिले. बल्ले बल्ले गाण्यावर ठेका धरला होता. मुलांनी डोरेमॉन, मिकी माऊस, छोटा भीम आणि इतर कार्टून पात्रांसोबत खेळण्याचाही आनंद लुटतानाचे पाहून मनोमन समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT