पुणे

सासवडमध्ये तपासणी किटच संपले, चाचण्यांचा वेग मंदावल्याने मनस्ताप

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड (ता. पुरंदर) येथे `रॅपिड अँटिजेन टेस्ट`द्वारे कोरोना चाचणीचा वेग वाढविण्याऐवजी आज चाचणीच्या किटअभावी ही चाचणीच बंद पडली. पुण्यातील संबंधीत यंत्रणेकडून या चाचणीचे किट्स येथील रुग्णालयातील चाचणी केंद्रास उपलब्ध न झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण व सर्वाधिक मोठे शहर असलेल्या हॉटस्पॉट ठरलेल्या सासवडला ही समस्या झाल्याने मोठी डोकेदुखी वाढणार आहे.

सासवडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तथा कोविड विभागाचे मुख्य समन्वयक डॉ. किरण राऊत यांनी याबाबत जाहीरपणे सांगितले की, पुणे येथील सिव्हील हॉस्पीटलमधून सासवडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड चाचणी केंद्रावर अँटिजन किट उपलब्ध न झाल्याने `रॅपिड अँटिजेन टेस्ट`द्वारे (नाकातील स्वॅबद्वारे चाचणी) कोरोना चाचणी बंद झाली. आरटीपीसीआर चाचणीसाठी घशातील स्वॅब नमुने घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात तपासणी अहवालासाठी पाठविले जातील.

त्याचे चाचणी अहवाल येतील, त्यावेळी कळविले जातील. `रॅपिड अँटिजेन टेस्ट`द्वारे तास - दोन तासात जे कोरोना बाधीत आहेत किंवा नाहीत, हे लगेच कळत होते, ते आता दुसऱ्या किंवा अगदी तिसऱ्या दिवशी समजणार आहे. ही समस्या जिल्हा ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी असू शकेल. येथील प्रांत, तहसिलदार, लोकप्रतिनीधी आणि बहुतेक वरीष्ठांना ही बाब कळविली आहे. येत्या पाच - सहा दिवसात किट उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, रोज दोनशे ते तीनशेहून अधिक चाचणी अहवाल यायचे, तिथे घशातील जुने जुजबी अहवाल आले.

डॉ. राऊत म्हणाले, संशयित रुग्ण बाधीत आहे किंवा पॉझिटिव्ह आहे, हे समजल्यावर तो घरगुती क्वारंटाईन होत होता. त्रास वाटला तर कोविड केअर सेंटरला जात होता. अधिक त्रास व व्याधीचे लोक, वयस्कर लोक रुग्णालयात दाखल होत होते. किटअभावी चाचणी अहवाल लगेच आला नाही, तरी ज्यांनी नाकातील ऐवजी घशातील स्वॅब दिले. त्यांचे अहवाल आले नाही, म्हणून त्यांनी फिरु नये. संशयित कोरोना संशयित रुग्ण म्हणून घरातच वेगळे थांबावे. कम्युनिटी स्प्रेडला अजून बळकटी देऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT